वेस्ट इंडिजच्या भारतीय दौऱ्याला शुक्रवारपासून सुरुवात होत असून त्यांना ‘भारत-अ’विरुद्ध पहिला सराव सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळावा लागणार आहे.
चॅम्पियन्स लीगसाठी वेस्ट इंडिजच्या संघातील काही खेळाडू भारतामध्येच असून त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतलेले आहे, त्यामुळे त्यांना जास्त समस्या जाणवणार नाहीत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या युवा खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना ही एक चांगली संधी असेल. त्यामुळे या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी भारतीय ‘अ’ संघ सज्ज असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ‘अ’ संघ :  मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुक्त चंद, मुरली विजय, करुण नायर, केदार जाधव, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, परवेझ रसूल, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, करण शर्मा, गुरकीरत सिंग.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, लिऑन जॉन्सन, सुनील नरीन, किरॉन पोलार्ड, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, मालरेन सॅम्युअल्स, लिन्डेल सिमोन्स, ड्वेन स्मिथ, जेरम टेलर.

नाइट रायडर्स अंतिम फेरीत
हैदराबाद : जॅक कॅलिसच्या नाबाद ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत होबार्ट हरिकेन्स संघावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने अंतिम फेरीत धडक मारली.