विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. बीसीसीआय विराटवरील अतिक्रिकेटचा ताण कमी करण्यासाठी काहीकाळ रोहितकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं. रोहितच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र या दोघांमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण यावर फिरकीपटू चहलने आपलं मत दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा –  हार्दिकची जागा घेण्यासाठी नाही, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर – शिवम दुबे

“माझ्यामते विराट आणि रोहित एकसारखेच आहेत. दोघेही आपल्या गोलंदाजांना मनासारखी गोलंदाजी करण्याची मूभा देतात. आम्हाला क्षेत्ररक्षणात जसे बदल हवे असतात तसे बदल केले जातात. त्यामुळे माझ्या दृष्टीने दोघांमध्ये फारसा फरक जाणवत नाही. विराट थोडासा आक्रमक आहे, रोहितकडे तो गूण नाही…इतकाच काय तो फरक असेल. आपल्या गोलंदाजांना ते पूर्ण स्वातंत्र्य देतात.” Sportstar या संकेतस्थळाशी बोलताना चहल बोलत होता.

अवश्य वाचा – रोहित शर्माने घेतली केदार जाधवची फिरकी…म्हणाला पोज कमी मार, बॅटींगकडे लक्ष दे !

बांगलादेशविरुद्ध मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या मालिकेत चहलने रोहितच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती. आता भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर ३ टी-२० आणि ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा –  ऋषभची धोनी किंवा साहाशी तुलना करणं योग्य नाही – किरण मोरे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the better captain between virat kohli and rohit sharma yuzvendra chahal gives his take psd
First published on: 05-12-2019 at 13:20 IST