26 February 2021

News Flash

… तर टी-२० विश्वचषक भारताऐवजी अमिरातीत खेळवावा – पाकिस्तान

तीन राष्ट्रांच्या मानसिकतेत बदलाची नितांत आवश्यकता आहे

आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानचे खेळाडू आणि चाहत्यांना व्हिसाचे हमीपत्र देण्यात यावे, अन्यथा विश्वचषक स्पर्धा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी केली आहे.

क्रिकेट जगतातील अव्वल तीन राष्ट्रांच्या मानसिकतेत बदलाची नितांत आवश्यकता आहे, अशी भूमिका मणी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) व्यक्त केली आहे. ‘आम्हाला फक्त संघासाठीच नव्हे, तर चाहते, पदाधिकारी आणि पत्रांसाठीही व्हिसाची हमी हवी.’ मार्चच्या अखेरपर्यंत आम्हाला लिखित स्वरुपात ही हमी हवी, ” असे मणी यांनी सांगितलं. मणी यांनी भारतीय क्रिकेट मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबतही लिखित हमी मागितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 10:19 am

Web Title: will push for t20 world cups relocation in absence of visa assurance from india ehasn mani nck 90
Next Stories
1 IND vs ENG : …तरच उमेश यादवला संघात स्थान मिळेल
2 भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : मुंबईच्या सूर्यकुमारची भारतीय संघात निवड
3 मुंबईची सलामी आज दिल्लीशी
Just Now!
X