T20 World Cup IND vs SL : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारताने श्रीलंकेच्या संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माने धडाकेबाज ४७ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान कायम राखले. चार बळी मिळवणाऱ्या राधा यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना हिने दमदार सुरूवात केली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात स्मृती माघारी परतली. तिने ३ चौकारांसह १२ चेंडूत १७ धावा केल्या. फॉर्मशी झगडत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत पुन्हा अपयशी ठरली. १५ धावांची खेळी केल्यावर ती उंच फचका मारून झेलबाद झाली. शफाली वर्मा दमदार खेळी करत असताना तिला धावबाद व्हावे लागले. गेल्या सामन्यात ४६ धावांवर बाद झालेली शफाली आज ४७ धावांवर बाद झाली आणि पुन्हा तिचे अर्धशतक हुकले. त्यानंतर रॉड्रीग्ज (१५*) आणि दिप्ती शर्मा (१५*) यांनी भारताला विजय मिळवून दिला.

सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. दिप्ती शर्माने उमेशा थिमासीनीला दोन धावांवर बाद केलं आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चांगली भागीदारी होत असतानाच १७ चेंडूत १२ धावा करणारी हर्षिता माधवी त्रिफळाचीत झाली. राजेश्वरी गायकवाडने तिला माघारी धाडले. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने चांगली सुरूवात करत ३३ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली.

अटापटू बाद झाल्यावर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. हसीनी परेरा (७), करूणरत्ने (७), सिरीवर्धने (१३), अनुष्का संजीवनी (१) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे शंभरीच्या आत श्रीलंकेचे सात गडी माघारी परतले होते. निलाक्षी डी सिल्वा आणि दिलहारी यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरला, पण अखेर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात सिल्वा (८) माघारी परतली. अखेरच्या टप्प्यात दिलहारीने नाबाद २५ धावा करून श्रीलंकेला ११३ धावांपर्यंत पोहोचवले. राधा यादवने ४, राजेश्वरी गायकवाडने २ तर शिखा, पूनम आणि दिप्तीने १-१ बळी टिपला.

Live Blog

12:44 (IST)29 Feb 2020
भारताचा विजयी ‘चौकार’

भारताने श्रीलंकेच्या संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान कायम राखले.

11:56 (IST)29 Feb 2020
शफालीचं अर्धशतक पुन्हा हुकलं; झाली धावचीत

शफालीचं अर्धशतक पुन्हा हुकलं; झाली धावचीत

11:53 (IST)29 Feb 2020
कर्णधार हरमनप्रीत पुन्हा अपयशी

फॉर्मशी  झगडत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत पुन्हा अपयशी ठरली. १५ धावांची खेळी केल्यावर ती उंच फचका मारून झेलबाद झाली.

11:35 (IST)29 Feb 2020
फटकेबाजीच्या प्रयत्नात स्मृती माघारी

११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना हिने दमदार सुरूवात केली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात स्मृती माघारी परतली. तिने ३ चौकारांसह १२ चेंडूत १७ धावा केल्या.

11:14 (IST)29 Feb 2020
श्रीलंकन फलंदाजांची सुमार कामगिरी; भारताला ११४ धावांचे आव्हान

कर्णधार चमिरा अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने ११३ धावांचा टप्पा गाठला आणि भारताला ११४ धावांचे आव्हान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केली.

10:54 (IST)29 Feb 2020
श्रीलंकेला आठवा धक्का

निलाक्षी डी सिल्वा आणि दिलहारी यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरला. पण अखेर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात सिल्वा (८) माघारी परतली.

10:36 (IST)29 Feb 2020
शंभरीच्या आत श्रीलंकेचे सात गडी माघारी

अटापटू बाद झाल्यावर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. आधी हसीनी परेरा ७ धावांवर माघारी परतली. पाठोपाठ करूणरत्ने (७) आणि सिरीवर्धने (१३) दोघी झटपट बाद झाल्या. लगेचच अनुष्का संजीवनीही १ धाव काढून पायचीत झाली. त्यामुळे शंभरीच्या आत श्रीलंकेचे सात गडी माघारी परतले.

10:31 (IST)29 Feb 2020
कर्णधार अटापटू माघारी, भारताला तिसरं यश

श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने चांगली सुरूवात करत ३३ धावा केल्या होत्या, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली.

10:03 (IST)29 Feb 2020
हर्षिता माधवी बाद; श्रीलंकेला दुसरा धक्का

१७ चेंडूत १२ धावा करणारी हर्षिता माधवी त्रिफळाचीत झाली. राजेश्वरी गायकवाड निर्धाव षटक टाकत बळी टिपला.

09:44 (IST)29 Feb 2020
श्रीलंकेला पहिला धक्का

दिप्ती शर्मानं भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. दिप्तीनं  उमेशा थिमासीनीला दोन धावांवर बाद केलं.

09:20 (IST)29 Feb 2020
नाणेफेक जिंकून श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

पहिल्या तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय दिला आहे.