ग्लासगो शहरात सुरु असलेल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात सिंधूने चीनच्या चेन युफेईचा २१-१३, २१-१० असा धुव्वा उडवला. २०१३ आणि २०१४ साली सिंधूने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूच्या अष्टपैलू खेळापुढे चीनी प्रतिस्पर्ध्याचा टिकावच लागला नाही. अंतिम फेरीत सिंधूचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे.

अवश्य वाचा – जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत; अंतिम फेरीचे स्वप्न भंगले

पी.व्ही सिंधू आणि नोझोमी ओकुहाराचा सामना कधी खेळवला जाईल?

सिंधू आणि ओकुहाराचा सामना २७ ऑगस्ट म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे.

हा सामना कुठे खेळवला जाणार आहे?

सिंधू आणि ओकुहारा यांच्यातला बॅडमिंटन अजिंक्यपदाचा सामना हा स्कॉटलँड येथील ग्लास्गो शहरात खेळवला जाणार आहे.

अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण किता वाजता सुरु होईल?

अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण हे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होणार आहे. सिंधूचा सामना हा संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु होणार आहे.

सिंधूचा सामना ऑनलाईन कुठे पाहता येईल?

सिंधू आणि ओकुहारा यांच्यातला अंतिम सामना हा ‘हॉटस्टार’ तसेच जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल.

अवश्य वाचा – जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: पी. व्ही. सिंधूची फायनलमध्ये धडक