News Flash

पिंकी राणी उपांत्यपूर्व फेरीत; भारताची दोन पदके निश्चित

वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ही स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत चांगली आहे

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

नवी दिल्ली : जर्मनीतील कोलोग्नेत सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या पिंकी राणीने ५१ किलो वजनी गटात विजयी कामगिरीसह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच भारताची या स्पर्धेतील किमान दोन पदके निश्चित झाली आहेत.पिंकीने जर्मनीच्या उरसुला गोटलॉबला ५-० असे पराभूत केले, तर भारताच्या मीना कुमारी मेस्नाम आणि प्विलो बासुमातरी यांच्याकडून भारताला किमान रौप्य आणि कांस्यपदक निश्चित झाले आहेत. ५४ किलो वजनी गटात मीना कुमारी विजयी कामगिरीसह अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर बासुमातरी उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ही स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत चांगली आहे. २१ देशांमधील बॉक्सिंगपटू १७ वजनी प्रकारात सहभागी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:01 am

Web Title: world boxing competition pinki rani in quarter finals
Next Stories
1 IPL 2019 : धोनीची ‘शंभर नंबरी’ कामगिरी ! अनोखी कामगिरी करणारा पहिला कर्णधार
2 बायकोच्या वाढदिवसाला सबब नाही, सामन्याआधी अजिंक्य-राधिकाचं बर्थ-डे सेलिब्रेशन
3 IPL 2019 : ‘सर जाडेजा’ चमकले, शंभराव्या बळीची नोंद
Just Now!
X