भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होलटेज सामन्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कर्णधार सर्फराज खानला खास सल्ला दिला आहे. भारत विजयाचा दावेदार असेल, पण तुम्ही पराभवाला घाबरू नका. अखेरपर्यंत लढत राहा, असा सल्ला इम्रान खान यांनी सर्फराज आणि संघाला दिला आहे. इम्रान खान यांनी सामना सुरू होण्यापूर्वी काही तास आधी ट्विट करत आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

इम्रान खानी यांनी ट्विट करत पाकिस्तान संघाला शुभेच्छा देत चांगले खेळ करण्याचा सल्लाही दिला आहे. ते म्हणाले की,’ सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवायचा असेल तर मैदानावर मानसिकरित्या कणखर आणि सक्षम असायला हवं. ‘

‘ज्या वेळी मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती, त्यावेळी मला वाटले होते की, विजयासाठी ७० टक्के प्रतिभा आणि ३० टक्के मानसिकतेचं योगदान असते. पण ज्यावेळी मी क्रिकेट सोडलं त्यावेळी याची टक्केवारी ५०-५० असल्याचे समजलं. पण सध्या क्रिकेट पूर्णपणे बदलले आहे. मी गावसकरांच्या मताशी आहे. त्यांच्यामते सामना जिंकायचे असल्यास ६० टक्के मानसिक कणखरफणा आणि ४० प्रतिभा गरजेची असते.’

‘जसा सामन्यात रंगत निर्माण होईल तसे दोन्ही संघातील खेळाडूवर मानसिक दडपण वाढेल, अशात जो संघ मानसिक दबाव चांगल्या पद्धीतने हाताळेल त्या संघाचा विजय होईल. सर्फराजसारखा कर्णधार मिळ्यामुळे पाकिस्तानी संघ भाग्यशाली आहे. आज संघाला आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करायचे आहे. ‘

‘पाकिस्तान संघाने पराभवची भीती डोक्यातून काढून टाकावी, कारण मेंदू एका वेळी फक्त एकच विचार डोक्यात ठेवू शकतो. पराभवची भीती नकारात्मक आणि बचावात्मक रणनितीकडे घेऊन जाते. त्यामुळे विरोधी संघाच्या चुका नजरअंदाज होऊ शकतात, त्यामुळे सामना खेळताना फक्त विजयाचाच विचार करायला हवा.’

अखेरच्या ट्विटमध्ये इम्रान खान म्हणाले की, ‘भारत विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार असला तरही पाकिस्तानने पराभवाची भीती मनातून काढून टाकावी. संघानं फक्त अपल्या सर्वश्रेष्ठ कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावे आणि अखेरच्या चेंडूपर्यंत लढत रहावे. सामन्यानंतर आलेला निकाल खिलाडूवृत्तीनं स्वीकार करायला हवा.’