गेल्या काही सामन्यांपासून महेंद्रसिंह धोनी विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या संथ खेळीमुळे चांगलाच चर्चेत आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात धोनीने संथ खेळी करत सोशल मीडियावर चाहत्यांचा रोष ओढवून घेतला. विंडीजविरुद्ध सामन्यात धोनीने अर्धशतक झळकावलं खरं, मात्र यासाठी मधल्या षटकांमध्ये त्याने अनेक चेंडू खर्च केले. सर्वच स्तरातून धोनीवर टिकेची झोड उठत असताना जसप्रीत बुमराहने धोनीच्या खेळीचं समर्थन केलं आहे.

अवश्य वाचा – Video : धोनीचे चाहते आहात? मग हा झेल एकदा पाहाच….

“धोनीच्या खेळीवर अवाजवी टीका होत आहे. कित्येकदा तुम्हाला असं वाटतं की धोनी संथ खेळत आहे, पण सामन्यात कधीकधी वेळ घेऊन मैदानावर टिकून राहणंही गरजेचं असतं. विंडीज आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातही त्याने हेच केलं.” बुमराह bcci.tv ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात धोनीने ६१ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – World Cup 2019 : मला संधी द्या, हार्दिकला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनवतो !

दरम्यान जसप्रीत बुमराहनेही गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी चोख बजावली. त्याने ६ षटकात १ षटक निर्धाव टाकत अवघ्या ९ धावा देत २ बळी घेतले. विंडीजविरुद्धचा विजय हा भारताचा या स्पर्धेतला पाचवा विजय ठरला. या स्पर्धेत भारतासमोर रविवारी यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : चौथ्या क्रमांकासाठी ऋषभ पंत योग्य उमेदवार !