News Flash

World Cup 2019 : नक्कल करणं सर्वात सोपं, शमीच्या सेलिब्रेशनला शेल्डन कॉट्रेलचं चोख प्रत्युत्तर

विंडीजविरुद्ध सामन्यात शमीकडून कॉट्रेलची खिल्ली

वेस्ट इंडिजवर मात करत भारताने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. मोहम्मद शमीने गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी चोख बजावत ४ फलंदाजांना माघारी धाडलं. विंडीजचे खेळाडू मैदानात आपल्या अनोख्या सेलिब्रेशनसाठीही ओळखले जातात. सध्या विंडीजच्या शेल्डन कॉट्रेलचं विकेट घेतल्यानंतरच सॅल्युट सेलिब्रेशन चांगलच गाजतं आहे.

भारताविरुद्ध सामन्यात कॉट्रेल बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने कॉट्रेलच्या या सेलिब्रेशन स्टाईलची नक्कल करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेल्डन कॉट्रेल हे सॅल्युट सेलिब्रेशन आपल्या देशातील पोलिस आणि लष्कराला अभिवादन करण्यासाठी करतो. मात्र शमी आणि भारतीय खेळाडूंनी या प्रकाराची उडवलेल्या खिल्लीमुळे अनेक जण नाराज झाले होते. कॉट्रेलने मात्र शमीच्या या डिवचण्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. कॉट्रेल हा स्वतः लष्कराचा जवान आहे.

दरम्यान भारताविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर विंडीजचं या स्पर्धेतलं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. एका विजयासह विंडीजचा संघ ३ गुणांनीशी आठव्या स्थानावर आहे. साखळी फेरीत विंडीजचे केवळ २ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यांमध्ये विंडीजचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 9:40 pm

Web Title: world cup 2019 sheldon cottrell to mohammed shami nakal karna hi sabse badi chaploosi hai psd 91
टॅग : Mohammad Shami
Next Stories
1 World Cup 2019 : संभ्रम संपला, पाहा टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे अधिकृत फोटो
2 Video : श्रीलंका विरुद्ध आफ्रिका सामन्यात मैदानावर माश्यांचा हल्ला
3 World Cup 2019 : आफ्रिकेच्या विजयाने श्रीलंकेचं गणित बिघडलं, उपांत्य फेरीचा रस्ता अवघड
Just Now!
X