News Flash

दीपिका,अतानू उपांत्य फेरीत भारताच्या पाच पदकांची निश्चिती

या दोघांसह भारताने पाच पदकांची निश्चिती केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा

वेगवान माऱ्याशी सामना करीत अतानू दास आणि दीपिका कुमारी या भारताच्या आघाडीच्या दाम्पत्याने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वैयक्तिक रीकव्र्ह विभागात उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघांसह भारताने पाच पदकांची निश्चिती केली आहे.

जवळपास दोन वर्षांच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अतानू आणि दीपिका यांनी गतवर्षी विवाह केला. मिश्र दुहेरीत या जोडीने कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली आहे.

लॉस आर्कस क्रीडा संकुलातील वेगवान वाऱ्यांचे आव्हान पेलत तिसऱ्या मानांकित दीपिकाने जर्मनीच्या मिशेले क्रॉप्पेनचा सरळ सेटमध्ये पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव तिरंदाज दीपिकाने २०१२च्या अंताल्या (टर्की) आणि २०१८च्या सॉल्ट लेक सिटी (अमेरिका) येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धांचा दुसरा टप्पा गाठला होता. याशिवाय विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात तीनदा पदकांची कमाई केली आहे.

अतानूने उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या ईरिक पीटर्सचा ६-४ असा पराभव केला. त्यानंतर द्वितीय मानांकित दीपिका-अतानू जोडीने स्पेनच्या जाडीला नमवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत अलेजांड्राकडून पराभव पत्करल्याने अंकिता भकटचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष आणि महिला सांघिक गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठून भारतीय संघाने पदकांच्या आशा कायम राखल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:09 am

Web Title: world cup archery deepika atanu in the semifinals abn 97
Next Stories
1 जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा : सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार
2 पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर रोहित म्हणतो, “काहीतरी चुकतंय”
3 कोलकाता-राजस्थानपुढे सावरण्याचे आव्हान
Just Now!
X