भारतीय संघाने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशवर मात करत आपण अजुनही फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला. लोकेश राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत ९९ चेंडूंमध्ये १०८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. राहुलच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाची गेल्या कित्येक महिन्यांपासूनची, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची डोकेदुखी निकाली निघण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – Video : मराठमोळा केदार जाधव झळकणार Race 4 चित्रपटात, रोहित शर्माने दिले संकेत

आगामी सामन्यांमध्ये लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खुद्द याचे संकेत दिले आहेत. सामना संपल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. “राहुलने चौथ्या क्रमांकावर येऊन झळकावलेलं शतक ही माझ्यासाठी या सामन्यातली सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. संघातला प्रत्येक खेळाडू आपली भूमिका ओळखून आहे. लोकेशला सूर सापडणं हे महत्वाचं होतं.”

अवश्य वाचा – पहिल्या सामन्याआधी विंडिजचा संघ ‘होप’फुल, न्यूझीलंडविरुद्ध ४२१ धावांचा डोंगर

यावेळी बोलत असताना विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्याच्या खेळाचंही कौतुक केलं. धोनीने या सामन्यात ११३ धावा केल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २६४ धावांपर्यंत मजल मारु शकला. ९५ धावांनी सामना जिंकत भारतीय संघ आत्मविश्वासाने पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – निवृत्तीचा निर्णय धोनी योग्यवेळी घेईल – शेन वॉर्न