scorecardresearch

निवृत्तीचा निर्णय धोनी योग्यवेळी घेईल – शेन वॉर्न

सराव सामन्यात धोनीचं शतक

विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी फॉर्मात परतला आहे. बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात धोनीने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. काही महिन्यांपूर्वी धोनी फॉर्मात नसताना, त्याच्यावर निवृत्तीचा दबाव वाढला होता. अनेक माजी खेळाडूंनी धोनीने निवृत्ती स्विकारावी असाही सल्ला दिला होता. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या मते निवृत्तीचा निर्णय हा धोनीच योग्यवेळी घेईल. यासाठी त्याला सल्ल्याची गरज नाही.

“महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. मध्यंतरी काही लोकांकडून त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकण्यात येत होता ही गोष्टच मला पटली नाही. निवृत्ती कधी स्विकारायची याबाबत धोनीच निर्णय घेऊ शकतो आणि ती वेळ त्याला नक्की माहिती असेल. मग ती विश्वचषक संपल्यानंतर असो किंवा स्पर्धेनंतर ५ वर्षांनी असो, आपल्या निवृत्तीची वेळ ठरवण्याचा अधिकार धोनीला आहे.” शेन वॉर्न IANS वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – दुसऱ्या सराव सामन्यात भारत विजयी, धोनी-लोकेश राहुलची शतकी खेळी

विश्वचषक स्पर्धेआधी धोनीचं फॉर्मात येणं भारतीय संघासाठी महत्वाचं मानलं जात होतं. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात धोनी अपयशी ठरला होता. मात्र बांगलादेशविरुद्ध सामन्यात धोनीने मधल्या फळीत शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. ५ जूनरोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

अवश्य वाचा – Video : मराठमोळा केदार जाधव झळकणार Race 4 चित्रपटात, रोहित शर्माने दिले संकेत

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ( Cricket-world-cup-2019 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc world cup 2019 only ms dhoni will know when to retire says shane warne

ताज्या बातम्या