News Flash

World Wrestling Championship : दुखापतीमुळे भारताचं सुवर्णपदक हुकलं, दिपक पुनियाला रौप्यपदकावर समाधान

पहिल्याच स्पर्धेत दिपकची यशस्वी कामगिरी

भारताचा नवोदीत कुस्तीपटू दिपक पुनियाला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दिपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं.

“माझा डावा पाय प्रचंड दुखत आहे. खेळत असताना तो पाय शरीराचा भार पेलवू शकणार नाही हे मला जाणवलं. अशा परिस्थितीत मी खेळू शकणार नव्हतो. माझ्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी होती, पण माझा नाईलाज आहे.” दिपकने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आपली प्रतिक्रीया दिली. आपल्या पहिल्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दिपकने रौप्यपदकाची कमाई केली आहे. उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या स्टिफन रेचमर्थ याच्याविरोधात खेळताना दिपकला दुखापत झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:57 pm

Web Title: world wrestling championship deepak punia pulls out of final settles for silver psd 91
Next Stories
1 घरी परतताच धोनीने घालवला ‘या’ नव्या पाहुण्यासोबत वेळ; फोटो व्हायरल
2 IND vs SA : ‘हिटमॅन’ला ‘टी-२० किंग’ बनण्यासाठी हव्यात अवघ्या ** धावा
3 आफ्रिदीने सांगितले चार सर्वोत्तम फलंदाज; भारताच्या केवळ एका फलंदाजाला पसंती
Just Now!
X