News Flash

युकीची आगेकूच ; सोमदेव, रामकुमार पराभूत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या लढतीत पुरुष एकेरी विभागात युकी भांब्रीने विजयी आगेकूच केली

| January 15, 2015 03:44 am

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या लढतीत पुरुष एकेरी विभागात युकी भांब्रीने विजयी आगेकूच केली. मात्र सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.  
जागतिक क्रमवारीत ३१४व्या स्थानी असणाऱ्या रशियाच्या इव्गनी डॉन्सकॉयवर ४-६, ६-१, ८-६ असा विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतरही युकीने जिद्दीने खेळ करत मुकाबला जिंकला. पुढच्या लढतीत युकीची लढत जपानच्या योशिहिटो निशिओकाशी होणार आहे. ऑस्टिन क्रॅजिकने सोमदेववर ६-४, ३-६, ६-४ अशी मात केली. जर्मनीच्या निल्स लँगरने सोमदेवला ७-५, ४-६, ६-४ असे नमवले.
भारताला सोमदेवकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. पण त्याच्यापदरी पराभव पडल्याने यापुढे भारताच्या पुरुष एकेरीमध्ये आशा युकीवर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:44 am

Web Title: yuki wins but somdev ramkumar bow out of australian open qualifiers
Next Stories
1 सुमीत संगवान सर्वोत्तम बॉक्सर
2 महाराष्ट्राला आघाडी
3 ब्राव्हो आणि पोलार्ड यांची हकालपट्टी योग्यच-लॉइड
Just Now!
X