भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. २५० पेक्षा कमी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. सुरूवातीला विश्वचषकासाठी भारताचा संघ निवडण्यात आला, त्या संघात लयीत नसलेला महेंद्रसिंग धोनी, अगदीच नवखा आणि केवळ ५ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेला विजय शंकर अशा खेळाडूंना स्थान देण्यात आले आणि ऋषभ पंत, अंबाती रायडू यासारख्या खेळाडूंना संघातून डावलण्यात आले. त्या मुद्द्यावरून भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग याने प्रश्न उपस्थित केले.

“विराट सर्वोत्तम; बाबर आझम आसपासही नाही”; पाकिस्तानी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

जगभरात सध्या करोनामुळे क्रीडा बंद आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी आपापल्या घरात राहावे असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे युवराजने पीटीआयला इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून मुलाखत दिली. त्यात त्याने निवड समिती आणि निवड प्रक्रीया यावर प्रश्न उपस्थित केले. “२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी करण्यात आलेली टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड खूपच धक्कादायक होती. केवळ पाच वन डे सामन्यांचा अनुभव असलेला फलंदाज जेव्हा मधल्या फळीत खेळण्यासाठी निवडला जातो, तेव्हा खरं तर निवड समितीवर प्रश्नांची सरबत्ती होणं अपेक्षित आहे. पण सध्याचे निवड समिती सदस्य याबाबत प्रश्न विचारू शकतील का? ज्या निवड समितीतील सदस्य स्वत: फक्त पाच वन डे सामने खेळला असेल, ती समिती प्रश्न कशी काय विचारणार? अशा शब्दात युवराजने निवड प्रक्रीयेवर टीका केली.

‘हा’ फलंदाज मोडू शकतो माझा विक्रम; युवराजने दिलं उत्तर

याशिवाय, युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद म्हणजेच १२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. तो विक्रम अद्याप कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला की तुझा सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रम कोण मोडेल असं तुला वाटतं. यावर युवराज म्हणाला, “मला वाटतं की हार्दिक पांड्या माझा सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढू शकेल. त्याच्यात मी एक उत्तम अष्टपैलू खेळाडू पाहिला आहे. फक्त त्याला योग्यरितीने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.”