केपटाऊन कसोटी सामन्यात (IND vs SA) डीआरएस वादासाठी भारतीय संघावर कोणताही आरोप किंवा दंड लावण्यात आलेला नाही. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी टीम इंडियाला इशारा दिला असला, तरी संघावर कोणताही आरोप लावण्यात आलेला नाही. आयसीसीच्या सामना अधिकाऱ्यांनी भारतीय खेळाडूंचे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे मानले नाही.

केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २१व्या षटकात रवीचंद्रन अश्विनच्या चेंडूवर डीन एल्गरला मैदानी पंचांनी पायचीत घोषित केले. एल्गरने मात्र या निर्णयावर डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू स्टंपवरून जात होता आणि या कारणास्तव मैदानावरील अंपायरला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांचा या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. मैदानी पंच माराईस इरास्मस यांनाही चेंडू इतका उसळी घेईल यावर विश्वास बसत नव्हता.

हेही वाचा – VIDEO : “विराटला SUSPEND करा किंवा…”, इंग्लंडच्या मायकेल वॉनची ICCकडं मागणी!

यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त करत होस्ट ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टला काही गोष्टी सांगितल्या. विराटही संतापला. तो स्टम्प माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, “तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा, फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. सर्वच लोकांना पकडण्याचा प्रयत्न करा.” केएल राहुल म्हणाला, ”संपूर्ण देश ११ लोकांच्या विरोधात खेळत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाला केपटाऊन कसोटी सामन्यात ७ विकेटने पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच त्यांनी मालिका १-२ अशी गमावली होती. भारताचे दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले.