Lahore Qalandar vs Peshawar Zalmi: पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२३ मध्ये रविवारी (२६ फेब्रुवारी) लाहोर कलंदर्सने पेशावर झाल्मीचा ४० धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पीएसएलमध्ये पेशावर झल्मी संघाचा कर्णधार आहे, तर हारिस रौफ लाहोर कलंदर संघाचा भाग आहे. सामना सुरू होण्यापूर्वी बाबर आणि हरिस यांच्यातील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे लाहोर कलंदरने ट्विटरवर शेअर केले आहे. या संवादात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचाही उल्लेख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हारिस रौफ बाबर आझमला म्हणाला, “काहीही असो मला तुमची विकेट घ्यायची आहे, एक कोहली (विराट) आणि तुम्ही बाकी आहात. एक विल्यमसन (केन), तो दोनदा स्लिपमध्ये वाचला, हे तीन-चार खेळाडू माझ्या डोक्यात आहेत.” रौफने कोहलीचे नाव घेताच बाबर जोर-जोरात हसायला लागला.

यावर बाबर रौफला म्हणाला, ‘पण तुम्ही मला सराव सत्रात बाद केले आहे, ते मान्य करा.’ यावर रौफने लगेच उत्तर दिले की, ‘असे नाही सामन्यात बाद करायचे आहे.’ त्यावर बाबर म्हाणाला की, देव तुमची मदत करेल.’ लाहोर कलंदर्सविरुद्ध बाबर आझम अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्याला लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन आफ्रिदीकडे बाद केले.

जेव्हा जेव्हा रौफ आणि विराटचा एकत्र उल्लेख होतो, तेव्हा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ ची आठवण येते. कारण या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात एक सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये विराट कोहलीने रौफच्या गोलंदाजीवर दोन शानदार षटकार मारून भारताला सामन्यात परत आणले होते. तो सामना भारताने जिंकला होती.

बाबर आझमच्या संघाचा ४० धावांनी पराभव –

सामन्याबद्दल बोलायचे तर, लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लाहोर कलंदरने २० षटकात ३ विकेट गमावत २४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बाबर आझमच्या नेतृत्वाखाली झाल्मीचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ २०१ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना ४० धावांनी पराभ पत्कारावा लागला.

हेही वाचा – ESP vs IOM: आयल ऑफ मॅनचा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम: संपूर्ण संघ अवघ्या ‘इतक्या’ धावांवर आटोपला

पाकिस्तान सुपर लीग २०२३ मधील पेशावर झल्मीचा ५ सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे. गुणतालिकेत तो खालून दुसऱ्या स्थानावर आहे. लाहोर कलंदर ४ पैकी ३ सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर २६ फेब्रुवारी २०२३ च्या रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात शाहीन आफ्रिदी पहिल्याच चेंडूपासून लयीत दिसला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of babar azam and haris raufs conversation during psl 2023 mentioning virat kohli is going viral vbm
First published on: 27-02-2023 at 17:23 IST