Mahendra Singh Dhoni Hookah Video Viral : महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शानदार खेळीसाठी आणि मैदानाबाहेर साधे जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. धोनीने त्याच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत होता, ज्याला पाहून सर्वांनी माहीचे कौतुक केले. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माजी भारतीय कर्णधार त्याच्या लांब केसांचा लूक असलेल्या सूटमध्ये दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. दरम्यान, सीएसकेचा कर्णधार हुक्का ओढताना दिसला. धोनीने आधी हुक्का तोंडात घातला आणि धूर आत घेतला आणि नंतर तो धूर बाहेर काढताना दिसला. धोनीच्या या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तो हुक्का आहे की नाही हे स्पष्ट नाही. मात्र, अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की धोनी हुक्का ओढतो आणि हे योग्य नाही. कारण माजी कर्णधार देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

महेंद्रसिंग धोनी झाला ट्रोल –

काही चाहत्यांचे म्हणणे आहे की धोनी फ्लेवर्ड हुक्का ओढत होता, जो हानिकारक नाही. धोनीने आधीच सांगितले होते की तो फ्लेवरचा हुक्का पितो. हा व्हिडीओ कधी आणि कुठे काढण्यात आला याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा – IND vs AFG : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आयपीएलच्या अनेक स्टार खेळाडूंचा संघात समावेश

सीएसकेला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली –

चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल २०२३ मध्ये विजेतेपद पटकावले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघ २०२३ मध्ये पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. धोनीने संपूर्ण हंगामात संघासाठी काही शानदार फिनिशिंग इनिंग खेळल्या होत्या, ज्याने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.

हेही वाचा – David Warner : ‘…म्हणून माझी आई डेव्हिडला ‘शैतान’ म्हणते’, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा

धोनीची आयपीएल कारकीर्द –

एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २५० आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यातील २१८ डावात फलंदाजी करताना ३८.७९ च्या सरासरीने आणि १३५.९२ च्या स्ट्राइक रेटने ५०८२ धावा केल्या आहेत. या काळात चेन्नईच्या कर्णधाराने २४ अर्धशतके झळकावली आहेत.