सरफराज खानने रणजी ट्रॉफीच्या गेल्या दोन मोसमात जबरदस्त फटकेबाजी केली आहे. त्याने प्रत्येक मोसमात ९०० पेक्षा जास्त धावा केल्या. चालू मोसमातही त्याने चांगली छाप पाडली. यानंतर ही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. तेव्हापासून सरफराज खूप चर्चेत आहे. आता तो पुन्हा एकदा त्याच्या वडिलांच्या एका वक्तव्याने चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ वर्षीय खेळाडूने सध्या सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील सहा सामन्यांत तीन शतके झळकावली आहेत. सर्फराजला त्याच्या दमदार फलंदाजीचे फळ मिळेल आणि भारताच्या कसोटी संघात त्याची निवड होऊ शकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा सरफराज मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील आहे. सरफराजचे वडील नौशाद खान यांच्याशी चांगले संबंध आहेत. नौशाद हे त्यांच्या मुलाचे प्रशिक्षकही आहेत. नौशाद यांनी सरफराजच्या बालपणाशी संबंधित एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: सूर्यकुमार, वॉशिंगटन आणि कुलदीपने घेतले महाकालचे दर्शन; ऋषभसाठी केली प्रार्थना, पाहा फोटो

अब्बू, अर्जुन, कितना नसीब वाला है –

नौशाद यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सरफराज अर्जुन तेंडुलकर (दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा) सोबत ज्युनियर गेम्ससाठी खेळत असे. तो अर्जुनाला भेटायचा. एके दिवशी सरफराज माझ्याकडे आला आणि म्हणाला, “अब्बू, अर्जुन, कितना नसीब वाला है? त्याच्याकडे आयुष्यात सर्वकाही आहे, जसे की कार, आयपॅड वगैरे.”

हेही वाचा – Danish Criticize Babar: कनेरियाची बाबर आझमवर सडकून टीका; म्हणाला, ‘तो संघासाठी नव्हे स्वतःसाठी …’

सरफराजच्या या वाक्याने नौशाद यांना त्यावेळी असहाय्य वाटले पण त्यानंतर सरफराजने वडिलांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “मी त्याच्या (अर्जुन) पेक्षा भाग्यवान आहे. कारण माझे वडील संपूर्ण दिवस माझ्यासोबत घालवतात. अर्जुनचे वडील त्याच्यासोबत खूप वेळ घालवू शकत नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abbu how lucky arjun tendulkar is sarfaraz khan father naushad told an emotional story related to his son vbm
First published on: 23-01-2023 at 12:31 IST