माजी कनिष्ठ विश्वविजेता अभिजित गुप्ताकडून भारताला गुरुवारी सुरू होत असलेल्या अबुधाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
अभिजितने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्याने डिसेंबरमध्ये एल आइन क्लासिक स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. तसेच त्याने दुबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही अजिंक्यपद पटकाविले होते.
या स्पर्धेत सूर्यशेखर गांगुली, विदित गुजराथी, एम. आर. ललितबाबू, जी. एन. गोपाळ, वैभव सुरी, अंकित राजपारा, सहज ग्रोव्हर, एम. शामसुंदर हे अन्य भारतीय खेळाडूही सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये चीनच्या वाँग हाओ याला अग्रमानांकन देण्यात आले आहे. आशिया खंडातील अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. युक्रेनचे युरी क्रिव्होरुचेन्को, अ‍ॅलेक्झांडर अ‍ॅरेश्चेन्को या बलाढय़ खेळाडूंनीही येथे भाग घेतला आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व रेथीम्नो आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अभिजित गुप्ता याला शेवटच्या टप्प्यात अपेक्षेइतकी प्रभावी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला अव्वल यश मिळविता आले नव्हते.