Wasim Jaffer Advice to Indian Team : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबाद कसोटीत टीम इंडियाचा २८ धावांनी पराभव झाला. या सामन्यात शुबमन गिल पुन्हा फ्लॉप ठरला. दोन्ही डावात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालने भारताची सलामी दिली. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने याबाबत टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहितने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे जाफरचे मत आहे.

भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर यांनी सोमवारी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांना टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरबाबत सल्ला दिला आहे. जाफर यांनी लिहिले, “माझ्या मते गिल आणि जैस्वाल यांनी सलामी दिली पाहिजे आणि रोहितने दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. शुबमनला फलंदाजीसाठी येण्याची वाट पाहणे फायद्याचे नाही, त्याने डावाची सुरुवात केली तर बरे होईल. रोहित खूप चांगला फिरकी खेळतो, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला फारशी चिंता असू नये.”

उल्लेखनीय म्हणजे शुबमनने टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी सलामी दिली आहे आणि चांगली कामगिरीही केली आहे. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात तो २३ धावा करून झाला. दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. या दोन्ही डावात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सलामी देताना यशस्वीने पहिल्या डावात ८० धावा केल्या होत्या. तसेच रोहितने पहिल्या डावात २४ धावा केल्या होत्या. रोहितने दुसऱ्या डावात ३९ धावा केल्या होत्या. मात्र यशस्वी १५ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाला आणखी एक धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या सामन्यात भारताचा २८ धावांनी दारूण पराभव –

ऑली पोप (१९६ धावा) च्या दमदमर शतकानंतर, नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टली (६२ धावांत ७ विकेट) याच्या जादुई स्पेलमुळे इंग्लंडने चौथ्या दिवशी भारतावर २८ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र हार्टलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून यजमान संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ६९.२ षटकांत २०२ धावांवर गारद झाला.