कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाने इतिहास रचला. मेस्सीच्या संघाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ऐतिहासिक विजयानंतर अर्जेंटिनाच्या काही खेळाडूंनी शिस्त विसरून असे काही कृत्य केले, ज्याने फुटबॉल जगताला आश्चर्याचा धक्का बसला. संघाच्या या सेलिब्रेशनवर जोरदार टीका होत आहे.
मार्टिनेझने केले होते अश्लील हावभाव –
फिफा विश्वचषक फायनलमध्ये अंतिम शिट्टी वाजल्यानंतर, मार्टिनेझने गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारासह अश्लील हावभाव केले. त्याचबरोबर अंतिम सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये एमबाप्पेला टोमणे मारताना ऐकले. आता अशा वादग्रस्त हावभावांचा फटका अर्जेंटिनाला सहन करावा लागत आहे.
फिफा करणार कारवाई –
फिफाच्या शिस्तपालन समितीने त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. फिफाने एका निवेदनात सांगितले,”फिफा शिस्तपालन समितीने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या अनुच्छेद ११ (आक्षेपार्ह वर्तन आणि निष्पक्ष खेळाच्या तत्त्वांचे उल्लंघन) आणि १२ (खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे गैरवर्तन) संभाव्य उल्लंघनामुळे कार्यवाही सुरू केली आहे.”
हेही वाचा – WIPL Media Rights: बीसीसीआय पुन्हा एकदा मालामाल; महिला आयपीएल मीडिया हक्कांमधून कमावला अब्जावधींचा गल्ला
फिफा विश्वचषक ट्रॉफी सेलिब्रेशनमध्ये संघाच्या खेळाडूंनी जे केले त्याबद्दल लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. अंतिम सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. अतिरिक्त वेळेत ३-३ अशा बरोबरीनंतर अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला.