Asia Cup 2022 : आशिया चषकात उद्या ‘ब’ गटात बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता शारजहा येथे हा सामना खेळवण्यात येईल.

हेही वाचा – IND vs PAK Asia Cup 2022 : “१० खेळाडू जरी सीमा रेषेवर ठेवले असते, तरी…”; सामन्यानंतर हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया

मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. बांग्लादेशला पराभूत करत अफगाणिस्तान सुपर ४ मध्ये आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्नात असणार आहे. अफगाणिस्तानचा नेट रन रेट सध्या चांगला आहे. त्यामुळे त्यांचा सुपर ४ मध्ये जाण्याचे जवळपास निश्चित आहे.

दुसरीकडे बांग्लादेश आशिया चषकात आपला पहिला सामना खेळणार आहे. कर्णधार शकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघ पहिल्या सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या काही दिवसांत बांग्लादेशला पाकिस्तान, वेस्ट-इंडिज आणि झिंम्बाबे बरोबर झालेल्या सिरीजमध्ये हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा आणि आशिया चषकात विजयी सलामी देण्याचा ते प्रतत्न करणार आहे.

हेही वाचा – हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर स्मृती इराणी यांची भन्नाट प्रतिक्रिया, वाचा…

बांग्लादेश संघ ( अंदाजे प्लेइंग ११ ) –

सब्बीर रहमान, मोहम्मद नईम, महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, शाकिब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महेदी हसन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, नसुम अहमद, मोहम्मद सैफुद्दीन

हेही वाचा – “मी २० धावा जास्त काढू शकतो, मात्र…”; स्लोव ओव्हर रेटच्या नव्या नियमांवर विरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया

अफगाणिस्तान संघ ( अंदाजे प्लेइंग ११ ) –

हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (wk), इब्राहिम झद्रान, करीम जनात, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी (c), रशीद खान, अजमातुल्ला उमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी