Sreesanth shared new video and said he called me a fixer : लिजेंड्स क्रिकेट लीग (एलएलसी) २०२३ चा एलिमिनेटर सामना ६ डिसेंबर रोजी गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान गुजरात संघाकडून खेळणारा गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात वाद झाला होता. आता हा त्यांचा मैदानावरील वाद सोशल मीडियापर्यंत पोहोचला आहे. बुधवारी सामना संपल्यानंतर श्रीसंतने एक व्हिडीओ शेअर करत गौतमवर गंभीरवर आरोप केले. या आरोपांना प्रत्युतर देण्यासाटी गौत गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यानंतर श्रीसंतने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे हा वाद किती टोकाला पोहोचला आहे ते समजते.

गौतम आणि श्रीसंत यांच्यात झाला होता वाद –

सामन्याच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीर स्ट्राइकवर असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. गंभीरने श्रीसंतचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत षटकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू डॉट होता. यानंतर श्रीसंतने निराशेने गंभीरकडे पाहत काही शब्द बोलल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून गंभीरने या वेगवान गोलंदाजाकडे रोखून हातवारे केले. हा वाद इथेच थांबला नाही. एका चाहत्याने स्टँडवरून रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, हा व्हिडीओ कॅपिटल्सचा फलंदाज बाद झाल्यानंतरचा आहे. त्या ब्रेकदरम्यान गंभीर आणि श्रीसंतमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाल्याचे दिसत आहे.

सामन्यानंतर शेअर केलेल्या व्हिडीओत श्रीसंत म्हणाला, “मिस्टर फायटरसोबत काय घडले याबद्दल मला काही स्पष्ट करायचे होते. मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठांचाही आदर करत नाही, अगदी वीरू भाई (सेहवाग)चाही नाही. आजही तेच घडले. कोणतीही चिथावणी न देता तो माझ्याशी काहीतरी बोलत राहिला, जे अत्यंत असभ्य होते. त्याने त्या गोष्टी बोलायला नको होत्या.”

हेही वाचा – LLC 2023 : “मैदानावर त्याने जे शब्द वापरले, ते मी…”, गौतम गंभीरशी झालेल्या वादावर श्रीसंतने दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न – गौतम गंभीर

एस श्रीसंतने सामन्यानंतर शेअर केलेल्या व्हिडीओत गौतमवर बरेच गंभीर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गौतमने एक्स अॅपवर पोस्ट शेअर करताना लिहले की, ज्यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये आहे आणि हसत आहे. गंभीर भारतीय संघात खेळत असतानाचा हा फोटो आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा लोक फक्त जगात लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा फक्त हसत रहा.’

हेही वाचा – LLC 2023 : लाइव्ह सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत भिडले, वादाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

तो मला फिक्सर-फिक्सर म्हणत होता – एस श्रीसंत

गौतम गंभीरच्या सोशल मीडिया पोस्टनंतर आता एस श्रीसंतने पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. श्रीसंतने या नवीन व्हिडिओमध्ये म्हटले आहे की तो सतत गौतम गंभीरला विचारत होता की तो ‘फिक्सर-फिक्सर’ का म्हणत आहे. श्रीसंत म्हणाला, “अनेक वृत्तवाहिन्या मला फोन करत आहेत आणि माझ्याकडून मैदानावर काय घडले हे जाणून घ्यायचे आहे. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी पीआरमध्ये खूप पैसे खर्च करते आणि चुकीच्या गोष्टी पसरवते. म्हणूनच मी लाइव्ह येत तुमच्याशी बोलत आहे. मला प्रत्येक वृत्तवाहिनीवर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करायची नाही. तो (गंभीर) किती शक्तिशाली आहे आणि तो पीआरवर किती खर्च करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. मी एक सामान्य माणूस आहे, ज्याने माझ्या कुटुंबासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी एकट्याने लढा दिला आहे. त्यामध्ये तुम्हा सर्वांचेही सहकार्य लाभले आहे.”

हेही वाचा – Brian Lara : विराट कोहली सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकत नाही, माजी खेळाडूंने सांगितले कारण

लाइव्ह टीव्हीवर संपूर्ण जगासमोर तो मला फिक्सर- फिक्सर म्हणत राहिला –

माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, “लाइव्ह टीव्हीवर संपूर्ण जगासमोर तो मला फिक्सर- फिक्सर म्हणत राहिला. मी त्याला एकही वाईट शब्द बोललो नाही. मी त्याच्यासाठी कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला नाही. मी फक्त त्याला विचारले, तू मला काय म्हणत आहेस? आणि मी हसत होतो. तो मला पुन्हा पुन्हा फिक्सर म्हणत होता. तसेच अपशब्द वापरत होता. अंपायर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही तो असेच शब्द वापरत होता. कदाचित त्यांचा पीआर खूप मजबूत असेल, पण मी प्रत्येक चॅनलवर येऊन तेच सांगू शकत नाही. म्हणूनच मी लाइव्ह आलो आहे आणि तुम्हाला संपूर्ण सत्य सांगितले आहे. सोशल मीडियावर माझ्याविरोधातील कोणताही व्हिडीओ व्हायरल होत असेल, तर त्याची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हे समजावे. मी माझ्या बाजूने एकही अपशब्द किंवा शिवीगाळ केली नाही.”

तो फक्त माझ्यासोबतच असे करत नाही तर…

श्रीसंत पुढे म्हणाला, “तो फक्त माझ्यासोबतच असे करत नाही तर अनेक लोकांसोबत असे केले आहे. त्यांनी हे का सुरू केले ते मला माहित नाही. विकेट पडल्यावर ब्रेकच्या वेळीही तो माझ्याशी काही शब्द बोलत राहिला. सिक्सर-सिक्सरने काहीतरी बोलल्याचा संदेश सोशल मीडियावर लोकांनी पसरवला, पण तो तसा बोलला नाही. गंभीर म्हणाला तू फिक्सर आहेस. ही बोलण्याची पद्धत नाही. मला हवे असल्यास मी यावर पुढील कारवाई करू शकतो. मला फक्त हे प्रकरण इथेच संपवायचे आहे, परंतु त्याचे लोक त्याचे वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.”