Women’s Premier League (WPL) Title Sponsor: बीसीसीआय अनेक दिवसांपासून महिला प्रीमियर लीग (WPL) आयोजित करण्याची तयारी करत आहे. नुकताच डब्ल्यूपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, डब्ल्यूपीएलला टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. टाटा समूह, भारतातील एक प्रसिद्ध व्यवसाय समूहाने, डब्ल्यूपीएलचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार प्राप्त केले आहेत. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) बीसीसीआय आणि टाटा यांच्यात टायटल स्पॉन्सरशिपबाबत करार झाला.

तथापि, या क्षणी कराराच्या आर्थिक पैलूंचा खुलासा करण्यात आलेला नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, टाटांनी पाच वर्षांसाठी हक्क सुरक्षित केले आहेत. टाटांनी गेल्या वर्षी आयपीएलचे हक्कही विकत घेतले होते. २०२२ मध्ये, टाटा चीनी मोबाईल कंपनी विवोच्या जागी आयपीएलचे टायटल प्रायोजक बनले.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विटरवर टाटा डब्ल्यूपीएल टायटल प्रायोजक बनल्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “मला हे घोषित करताना अत्यंत आनंद होत आहे की, टाटा समूह पहिल्या डब्ल्यूपीएलचे टायटल प्रायोजक असेल. त्यांच्या पाठिंब्याने आम्ही महिला क्रिकेटला पुढच्या स्तरावर नेऊ शकतो, असा विश्वास आहे.”

डब्ल्यूपीएल या तारखेपासून सुरू होईल –

डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे. पहिला सामना ४ मार्चला तर अंतिम सामना २६ मार्चला होणार आहे. लिलावात ८७ खेळाडूंवर पाच संघांनी ५९.५० कोटी रुपये खर्च केले. प्रत्येक फ्रँचायझीला १२-१२कोटी खर्च करण्याची मर्यादा होती. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला आरसीबीने ३ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले. विशेष म्हणजे बीसीसीआयने पाच संघांचे मालकी हक्क विकून तब्बल ४६७० कोटी रुपये कमावले होते. याशिवाय, बोर्डाने प्रसारण हक्कातून ९५१ कोटी रुपये उभे केले.

हेही वाचा – Ajit Chandila: राजस्थान रॉयल्सच्या आजीवन बंदी असलेल्या माजी क्रिकेटपटूला दिलासा; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला आयपीएलमधील भारताच्या सर्वात महागड्या खेळाडू-

या लिलावामध्ये दहा भारतीय क्रिकेटपटूंना एक कोटी रुपये किंवा त्यावरील रकमेची बोली लागली. स्मृती मनधाना (३.४ कोटी), दीप्ती शर्मा (२.६ कोटी), जेमायमा रॉड्रिग्ज (२.२ कोटी), शफाली वर्मा (२ कोटी), पूजा वस्त्रकार (१.९ कोटी), रिचा घोष (१.९ कोटी), हरमनप्रीत कौर (१.८ कोटी), यास्तिका भाटिया (१.५ कोटी), रेणुका सिंग (१.५ कोटी), देविका वैद्य (१.४ कोटी) या दहा जणींची नावे आता अधिक घरांमध्ये पोहोचतील