scorecardresearch

Sohail Khan: सोहेल खानने उमरान मलिकबाबत ओकली गरळ; म्हणाला, ‘त्याच्यासारखे गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक…’

Sohail Khan on Umran Malik: पाकिसत्तानचा माजी गोलंजदाज सोहेल खानने उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यामते, उमरान मलिकसारखे बरेचसे गोलंदाज पाकिस्तानच्या लीग क्रिकेटमध्ये आहेत. त्यामुळे शोएब अख्तरचा विक्रम फक्त गोलंदाजीची मशीनच मोडू शकतो.

Sohail Khan on Umran Malik
उमरान मलिक (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

वेगवान गोलंदाज उमरान मलिक अलीकडच्या काळात आपल्या गोलंदाजीने चर्चेत आहे. वसीम अक्रम, ब्रेट ली आणि डेल स्टेन यांसारख्या दिग्गज वेगवान गोलंदाजांनी या खेळाडूची स्तुती केली आहे.उमरानच्या गोलंदाजीचे सर्वजण कौतुक करत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सोहेल खानने एक मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये उमरानसारख्या गोलंदाजांनी भरलेले आहे. अलीकडेच तो अविराट कोहलीबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता.

नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये सोहेल म्हणाला, ”मला वाटते उमरान मलिक हा मुलगा चांगला गोलंदाज आहे. मी १-२ सामने पाहिले आहेत. तो वेगाने धावतो आणि इतर गोष्टीही तपासत असतो. परंतु जर तुम्ही १५०-१५५ किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर, मी सध्या टेप-बॉल क्रिकेट खेळणारे १२-१५ खेळाडू मोजू शकतो. जर तुम्ही लाहोर कलंदर्सने आयोजित केलेल्या ट्रेल्सवर गेलात तर तुम्हाला अनेक खेळाडू सापडतील.”

तो पुढे म्हणाला, ”असे अनेक आहेत. आमचे देशांतर्गत क्रिकेट याने भरलेले आहे. जेव्हा एखादा गोलंदाज आपल्या देशांतर्गत स्तरावर येतो, तेव्हा तो एक विश्वासार्ह गोलंदाज बनतो. शाहीन, नसीम शाह, हरिस रौफ… हे असे गोलंदाज आहेत, ज्यांना त्यांचे काम माहीत आहे. मी तुम्हाला अनेक नावे देऊ शकतो.”

हेही वाचा – WPL 2023 Schedule: ४ मार्चपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; पहिल्या सामन्यात ‘हे’ दोन संघ असणार आमनेसामने

उमरान मलिकने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १५६-५७ KMPH या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर असे म्हटले जात आहे की, आगामी काळात तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा विक्रम मोडू शकतो. १६१.३किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे. पण शोएबचा हा विक्रम फक्त बॉलिंग मशीनच मोडू शकते, असे सोहेलला वाटते.

हेही वाचा – Dipa Karmakar Ban: स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मोठा धक्का, डोपिंगच्या आरोपावरून आयटीएने घातली २१ महिन्यांची बंदी

सोहेल म्हणाला, ”शोएब अख्तरचा विक्रम मोडू शकणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे गोलंदाजी मशीन. कारण कोणीही माणूस असे करू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे शोएबइतकी मेहनत कोणीही केलेली नाही. तो एका दिवसात ३२ फेऱ्या करायचा, मी आठवड्यात १० फेऱ्या करायचो. तो टेकड्यांवर पायात वजन घेऊन धावत असे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:03 IST
ताज्या बातम्या