Women’s T20 World Cup 2023 Semifinal: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात बेथ मुनी ५४ धावा करून बाद झाली, तिला शिखा पांडेने शफाली वर्माच्या हाती झेलबाद केले. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाच्या धावसंख्येला लगाम लावू शकला.

वास्तविक, शिखा पांडेने टीम इंडियासाठी १२ वे षटक टाकायला आली होती. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिने बेथ मुनीला शफाली वर्माकडे झेलबाद केले. मुनीने चौकार मारण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये ती अयशस्वी ठरली आणि शफालीने शानदार झेल घेतला. झेल टिपल्यानंतर तिने आक्रमकता दाखवली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूलँड्स येथील केप टाउन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाकडून बेथ मूनीने सर्वाधिक ५४ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर मेग लॅनिंग नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. तसेच भारतासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले.

बाद होण्यापूर्वी बेथ मुनीने ३७ चेंडूचा सामना करताना ७ चौकार १ षटकार लगावत ५४ धावांची खेळी केली. त्याचबरोबर मेग लॅनिंगने ३४ चेंडूत ४९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अ‍ॅलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहम, जेस जोनासेन, मेगन शट, डार्सी ब्राउन