Akash Deep Ball To Dismiss Harry Brook: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर ५८७ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचे सुरूवातीचे ५ फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. पण हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. दरम्यान आकाश दीपच्या भन्नाट चेंडूवर हॅरी ब्रुक त्रिफळाचित होऊन माघारी परतला.
या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच मोहम्मद सिराजने इंग्लंडला लागोपाठ २ मोठे धक्के दिले. आधी जो रूट आणि पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्स शून्यावर बाद होऊन माघारी परतला. इथून इंग्लंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर होता. पण हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून ३०३ धावा जोडल्या.या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने फॉलोऑन टाळला आणि ४०० धावांचा पल्ला गाठला.
हॅरी ब्रुकला बाद करणं मुळीच सोपं वाटत नव्हतं. कारण, दोघेही चांगल्या चेंडूंचा आदर करत होते. तर संधी मिळालेल्या चेंडूवर मोठे फटके देखील मारत होते. त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी १५०-१५० धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान आकाश दीपने भन्नाट चेंडू टाकून त्याला बाद केलं.
तर झाले असे की, भारती संघाची गोलंदाजी सुरू असताना ८३ वे षटक टाकण्यासाठी आकाश दीप गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू आकाश दीपने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. चो टप्पा पडला आणि वेगाने आत आला. ब्रुकने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू यष्टीला जाऊन धडकला. या शानदार चेंडूमुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला. च्या १५८ धावांच्या खेळीला पूर्णविराम लागला. यासह दोघांची ३०३ धावांची भागीदारी देखील मोडली गेली.
सिराज- आकाश दीपची गोलंदाजी
या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने शानदार गोलंदाजी केली आहे. दोघांनी मिळून प्रत्येकी ३-३ गडी बाद केले आहेत. दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना आकाश दीपने २ तर मोहम्मद सिराजने १ गडी बाद केला होता. तर तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना आकाश दीपने १ आणि मोहम्मद सिराजने २ गडी बाद केले आहेत.