आयर्लंडची युवा क्रिकेटपटू एमी हंटरने तिच्या १६ व्या वाढदिवशी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १२१ धावा करून ती वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. यासह तिने भारताच्या मिताली राजचा विक्रम मोडला. मितालीने जून १९९९मध्ये आयर्लंडविरुद्ध १६ वर्षे आणि २०५ दिवस असे वय असताना शतक झळकावले. ती अजूनही वयाच्या ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू आहे.

बेलफास्टमधील शाळेत शिकणाऱ्या हंटरचा हा चौथा एकदिवसीय सामना आहे. तिच्या खेळीमुळे आयर्लंडने झिम्बाब्वेवर ८५ धावांनी विजय मिळवला. हंटरने मेमध्ये स्कॉटलंडविरुद्ध पदार्पण केले. एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी ती चौथी आयर्लंडची खेळाडू आहे, तर २००० नंतर पहिली महिला खेळाडू आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Rohit Sharma 17 times Golden Duck
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

हेही वाचा – IPL 2022 : मोठी बातमी..! केएल राहुल सोडणार पंजाबचा संघ?

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने निर्धारित षटकात ३ बाद ३१२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे संघ निर्धारित षटकात ८ बाद २२७ धावा करू शकला. हंटरने त्याच्या नाबाद शतकी खेळीत ८ चौकार मारले. तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. झिम्बाब्वेकडून जोशफिनने सर्वाधिक ६६ धावा केल्या. मात्र, आयर्लंडच्या गोलंदाजांसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज चाचपडताना दिसले.

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर पुरुष क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीर फलंदाजाचा विक्रम आहे. त्याने १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६ वर्षे २१७ दिवस असे वय असताना १०२ धावा केल्या.