कॅरेबियन स्टार फलंदाज आंद्रे रसेल हा त्याच्या पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोणत्याही गोलंदाजीविरुद्ध सामना जिंकण्याची ताकद रसेलमध्ये आहे. तेच पुन्हा एकदा पाहायला मिळाले. खरेतर, शनिवारी (3 डिसेंबर) रसेलचे वादळ अबू धाबी टी-१० लीगमध्ये पाहायला मिळाले. त्याने तुफानी अर्धशतक झळकावत डेक्कन ग्लॅडिएटर्सला स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवले.

या सामन्यात आंद्रे रसेलने ३२ चेंडूत चौकार आणि षटकारांची बरसात करत ६३ धावा केल्या. यादरम्यान रसेलचा स्ट्राइक रेट १९६.८७ होता. कॅरेबियन पॉवर हिटरची बॅटमधून ७ चौकार आणि ४ षटकारा निघाले. म्हणजे त्याने आपल्या खेळीत केवळ ११ चेंडूत ५२ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर डेक्कन ग्लॅडिएटर्सने ४ चेंडू राखून सामना जिंकला. त्तत्पुर्वी आंद्रे रसेल करीम जनतच्या षटकात बाद झाला.

टी-१० लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्याबद्दल सांगायचे तर, डेक्कन ग्लॅडिएटर्सचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकून मॉरिसविले सॅम्प आर्मीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर कर्णधार मोईन अलीच्या ७८ धावांच्या जोरावर त्यांनी निर्धारित १० षटकात ११९ धावा केल्या. डेक्कन ग्लॅडिएटर्सला विजयासाठी १२० धावा करायच्या होत्या, ज्या त्यांनी रसेल (६३) आणि निकोलस पूरन (३८) यांच्या खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केल्या. त्याचबरोबर अंतिम सामन्यात त्यांचा सामना न्यूयॉर्क स्ट्रायकर्स सोबत आज संघ्याकाळी सहा वाजता खेळला जाणार आहे.

हेही वाचा – IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या वादग्रस्त रनआऊटबाबत वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘ब्रेकच्या वेळी…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंद्रे रसेल हा जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा एक भाग आहे. रसेलसाठी शेवटचा मोसम खूप चांगला होता. कॅरेबियन खेळाडूने १४ सामन्यात १७३.४८च्या स्ट्राईक रेटने ३३५ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर रसेलने या स्पर्धेत १७ विकेट्स घेतल्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलच्या आगामी हंगामात सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.