मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दिग्गज खेळाडूंची नक्कल केल्यानंतर आता रोहित शर्माचा दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्माने युवराज सिंग, वेंकटेश प्रसाद आणि झहिर खानची अ‍ॅक्शन केली आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स येत आहेत.

व्हिडिओत सर्वात प्रथम रोहित शर्माने युवराज सिंगची नक्कल केली. त्याच्या चालण्याची स्टाईल आणि स्टारडम त्याने आपल्या अ‍ॅक्शनमधून दाखवलं. युवराज फॅन्सना कसा भेटतो, यावर त्याने प्रकाश टाकला. त्यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद गोलंदाजीची नक्कल केली. वर्ल्डकप १९९६ मध्ये आमिर सोहेलला त्रिफळाचीत केल्यानंतर त्याचं अग्रेशन त्याने आपल्या अभिनयातून दाखवलं आहे. तिसऱ्या खेळाडूची नक्कल करताना तो मध्येच थांबला. मात्र त्यानंतर वेगवान गोलंदाज जहीर खानची गोलंदाजीची अ‍ॅक्शन केली. या व्हिडिओला हरभजन सिंगने कमेंट्स करत उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स प्लेऑफमधील स्थान अजून निश्चित नाही. राजस्थान आणि कोलकाता सामन्यावर मुंबईचं भवितव्य अवलंबून आहे. एकीकडे मुंबईकर फॅन्सना संघाची चिंता असताना कर्णधार रोहित शर्माने दिग्गज क्रिकेटपटूंची केलेली नक्कल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रोहित शर्माने क्रिकेटपटूंची खेळाडूंची नक्कल केली.