अंशु मलिक जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिने उपांत्य फेरीत ज्युनियर युरोपियन चॅम्पियन सोलोमिया विंकचा पराभव केला. दुसरीकडे, विश्वविजेतीला हरवणारी सरिता मोर उपांत्य फेरीत पराभूत झाली, त्यामुळे ती आता कांस्यपदकासाठी खेळेल. १९ वर्षीय अंशुने सुरुवातीपासूनच उपांत्य फेरीवर वर्चस्व राखले आणि तांत्रिक श्रेष्ठत्वाच्या जोरावर जिंकून ५७ किलो गटात अंतिम फेरी गाठली.

यापूर्वी भारताच्या चार महिला कुस्तीपटूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकली आहेत पण सर्वांना कांस्यपदक मिळाले आहे. गीता फोगाटने २०१२ मध्ये, बबिता फोगाटने २०१२ मध्ये, पूजा धांडाने २०१८मध्ये आणि विनेश फोगाटने २०१९मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

जागतिक चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणारी अंशु तिसरी भारतीय आहे. त्याच्या आधी सुशील कुमार (२०१०) आणि बजरंग पुनिया (२०१८) यांनी ही कामगिरी केली आहे. यापैकी फक्त सुशीलच सुवर्णपदक जिंकू शकला. तत्पूर्वी, अंशुने एकतर्फी लढतीत कझाकिस्तानच्या निलुफर रेमोवाचा पराभव केला आणि नंतर उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या देवाचीमेग एरखेम्बायरचा ५-१ असा पराभव केला.

हेही वाचा – IND vs NZ : क्रिकेटरसिकांसाठी खूशखबर! मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मिळू शकतो प्रवेश; पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गत आशियाई चॅम्पियन सरिता पहिल्या फेरीत २०१९ च्या विश्व चॅम्पियन कॅनेडियन कुस्तीपटूच्या विरोधात लढणार होती, पण तिने ५९ किलो वजनी गटातील प्री-क्वार्टर फायनलमध्ये ८-२ विजय मिळवला होता.