सिनेअभिनेता हृतिक रोशन, शाहिद कपूर यांच्यासह अभिनेत्री अनुष्का कपूर इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत. ७ एप्रिलला कोलकाता येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याद्वारे नव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. सैफ अली खान या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक, गीतकार फरहान अख्तर यांच्यासह संगीतकार प्रीतम हेही सोहळ्याचा भाग असणार आहेत. सर्व आठ संघांचे कर्णधार या सोहळ्याला उपस्थित असतील आणि एमसीसीच्या खेळभावनेची जपणूक करण्याची प्रतिज्ञा ते या वेळी घेतील. गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर जेतेपदाचा चषक रिंगणात ठेवेल, ज्याद्वारे नव्या हंगामाची सुरुवात झाल्याची औपचारिक घोषणा होईल.