Argentina vs France FIFA WC Final Highlights Updates: कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारत विश्वचषक आपल्या नावे केला. या लिओनेल मेस्सी याच्या शानदार कारकिर्दीची अखेर विजयाने झाली.

कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना आज रात्री खेळवला जातआहे. या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला सुरु आहेत. आजचा हा अंतिम सामना जोरदार आणि रोमांचक असेल यात दुमत नाही. कारण या सामन्यात किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू झुंजताना दिसणार आहेत. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ पहिल्या सत्रात २-० ने आघाडीवर आहे. संघासाठी लिओनेल मेस्सीने पहिला तर अँजेल डी मारियाने दुसरा गोल केला. दोन्ही गोलांमुळे अर्जेंटिनाने सामन्यावर मजबूत पकड ठेवली आहे. चेंडू ताब्यात घेण्यातही अर्जेंटिना पुढे आहे. अर्जेंटिनाने ६० टक्के चेंडूवर ताबा ठेवला आहे. त्याचबरोबर फ्रान्सचा चेंडूवर ताबा ४० टक्के आहे.

Viral Video Dolly Chaiwalla Visit Dubai And Enter Burj Khalifa On Top Flower To sips One Cup coffee
डॉली चहाविक्रेत्याची दुबई सफर; एक कप कॉफी अन् बुर्ज खलिफाची झलक, पाहा VIDEO
Rohit Raut stunning performance at Ajay-Atul live concert video viral
Video: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये रोहित राऊतचा जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन्…”
gulabi sadi ani lali lal lal marathi song in gujarati version
“गुलाबी साडी आणि लाली लाल लाल” गाणं गुजरातीमध्ये ऐकलं का? व्हायरल VIDEO एकदा पाहाच
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

तत्पूर्वी, सामन्याला सुरुवात झाली तेव्हा २० मिनिटांपर्यंत एकही संघ आक्रमक खेळ करताना दिसला नाही. दोन्ही संघांना एकही गोल करता आलेला नव्हता. स्कोअर ०-० असा बरोबरीत होता. अल्वारेझने तिसरा आणि रॉड्रि डी पॉलने सातव्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्जेंटिनाला यश मिळू शकले नाही. अल्वारेझचा फटका थेट फ्रेंच गोलरक्षक ह्युगो लॉरिसच्या हातात गेला. त्याचवेळी डी पॉलचा फटका फ्रान्सच्या खेळाडूवर आदळला आणि गोलपोस्टजवळून बाहेर गेला.

त्यानंतर स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने शानदार खेळ दाखवला. त्याने अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याने २३व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने पेनल्टी बॉक्समध्ये अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाला खाली आणले. त्याची चूक पाहून रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी दिली. कर्णधार मेस्सीने कोणतीही चूक न करता चेंडू थेट गोलपोस्टमध्ये टाकला. आक्रमक खेळ कायम ठेवत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सविरुद्ध दुसरा गोल केला. ३६व्या मिनिटाला एंजल डी मारियाने गोल पोस्टमध्ये चेंडू टाकला. फ्रान्सचा उपमेकानो चेंडूवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मेस्सीने मॅकअलिस्टरकडे चेंडू पास केला. मॅकअलिस्टरने डी मारियाकडे चेंडू पास केला. डी मारियाने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला.

कतारच्या लुसेल स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये चुरशीचा खेळ रंगत आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोघांच्या नजरा तिसऱ्या विजेतेपदावर असतील. अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याचवेळी फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. नुकत्याच झालेल्या सात विश्वचषक आवृत्त्यांमध्ये फ्रान्सने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २००६ मध्ये त्यांचा इटलीकडून पराभव झाला होता. दुसरीकडे, अर्जेंटिनाने शेवटचा २०१४ मध्ये विश्वचषक फायनल खेळला होता, जिथे त्यांचा जर्मनीविरुद्ध पराभव झाला होता.

Live Updates

FIFA World Cup Final Highlights France vs Argentina: फिफा वर्ल्ड कप फायनल फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना २०२२ हायलाइट्स

23:30 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: फिफा विश्वचषक २०२२चे अर्जेंटिना जगज्जेते

फ्रान्सने पहिला गोल केला अर्जेंटिनाने त्यांचा पहिला गोल केला फ्रान्सने त्यांचा दुसरा गोल नोंदवला अर्जेंटिनाने त्यांचा दुसरा गोल केला फ्रान्सने त्यांचा तिसरा गोल केला अर्जेंटिनाने त्यांचा तिसरा गोल केला फ्रान्सने चौथा गोल केला अर्जेंटिनाने चौथा गोल करून चॅम्पियन बनले.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604535989480955908?s=20&t=4Sq_HBfEk1lE5ty4Yn8rQQ

23:18 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: पेनल्टी शूटआऊटमध्ये अंतिम फेरी गाठली

अतिरिक्त वेळेतही फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील हा अंतिम सामना ३-३ असा बरोबरीत सुटला आहे. आता या रोमांचक सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागणार आहे.

फ्रान्स -१,०,०,१

अर्जेंटिना-१,१,१,१

23:14 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: एमबाप्पेने तिसरा गोल केला

११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत कायलियन एम्बाप्पेने फ्रान्सला सामन्यात परत आणले. आता स्कोअर ३-३ वर पोहोचला आहे. अतिरिक्त वेळेतही निकाल लागला नाही तर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केला जल्लोष.

23:12 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: पुरेपूर कोल्हापूर फुटबॉल फिवर जोरात

पुरेपूर कोल्हापूर फुटबॉल फिवर जोरात पाहायला मिळत आहे.

23:02 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: मेस्सीची जादू पुन्हा चालली

१०८व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत संघासाठी तिसरा गोल करत अर्जेंटिना संघाला ३-२अशी आघाडी मिळवून दिली. यासह मेस्सीने या विश्वचषकाच्या मोसमातील ७ वा गोल केला आहे.

https://twitter.com/hasanmdd/status/1604530680083648512?s=21

22:56 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: वाढीव वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी

वाढीव वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले आहेत. अर्जेंटिना-फ्रान्स २-२ बरोबरीत आहे. ९६व्या मिनिटाला फ्रान्सच्या संघाने एक बदल केला. त्याने मिडफिल्डर अॅड्रियन रॅबिओटला बाहेर बसवले. त्याच्या जागी मिडफिल्डर युसूफ फोफानाला पाचारण करण्यात आले आहे.

22:36 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: पुढच्या ३० मिनिटात ठरणार विश्वविजेता

निर्धारित वेळ आणि दुखापतीच्या वेळेनंतरही फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील हा अंतिम सामना २-२ असा बरोबरीत राहिला. आता सामन्यातील विजय-पराजयाचा निर्णय अतिरिक्त वेळेत होणार आहे. येथेही सामना बरोबरीत राहिला तर त्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटवर लागेल.

22:27 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: गोल्डन बूट शर्यतीत एमबाप्पे अव्वल स्थानावर आहे

एमबाप्पेने या विश्वचषकात आतापर्यंत ७ सामन्यांत ७ गोल केले आहेत. याशिवाय त्याने दोन गोल करण्यात मदत केली आहे. अशाप्रकारे एम्बाप्पे आता मेस्सीला मागे टाकत गोल्डन बूटच्या शर्यतीत पुढे आला आहे.

1. किलियन एमबाप्पे (फ्रांस)- ७ गोल

2. लियोनेल मेसी (अर्जेंटीना)- ६ गोल

3. ओलिवर गिरोड (फ्रांस)- ४ गोल

4. जूलियन अल्वारेज (अर्जेंटीना)- ४ गोल

https://twitter.com/imraina45/status/1604520077885198336?s=21

22:18 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: किलियन एमबाप्पेचे एकापाठोपाठ दोन गोल

फ्रान्सला ८०व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ती स्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेने घेतली. गोलरक्षक मार्टिनेझ पूर्णपणे तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका तो रोखू शकला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले आहे. त्याने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करून सामना बरोबरीत आणला.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604518919179362306?s=20&t=STezSDb8WqudourmDVwZZw

22:03 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: अर्जेंटिनाचा बचाव मजबूत, डी मारियाला पर्यायी खेळाडू मैदानात

अर्जेंटिना संघाने आपला अनुभवी फॉरवर्ड खेळाडू डी मारियाला बदली केले. त्याच्या जागी बचावपटू मार्कोस अक्युनाला पर्याय म्हणून मैदानावर बोलावण्यात आले. म्हणजेच अर्जेंटिना संघाला आता आपला बचाव मजबूत करायचा आहे हे स्पष्ट झाले आहे.

21:59 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: मेस्सी-अल्वारेझ गोल करण्याचा प्रयत्न केला

५९व्या मिनिटाला पुन्हा एकदा अर्जेंटिनाच्या ज्युलियन अल्वारेझने आपला दमदार खेळ दाखवला. त्याने चेंडू थेट फ्रेंच गोलपोस्टवर नेला आणि निशाण्यावर गोळी झाडली, पण फ्रान्सच्या गोलरक्षकाने त्याला अप्रतिमपणे वाचवले. पुढच्याच मिनिटाला डि मारियाच्या पासवर मेस्सीनेही अयशस्वी प्रयत्न केला. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्यात ६० मिनिटांचा खेळ पूर्ण झाला आहे. लिओनेल मेस्सीचा संघ अजूनही २-० ने आघाडीवर आहे. चेंडूचा ताबा, पासेस आणि गोलवर शॉट्समध्ये अर्जेंटिना आघाडीवर आहे. अर्जेंटिनाने गोलचे नऊ प्रयत्न केले आहेत. यापैकी पाच जण टार्गेटवर आहेत. त्याचवेळी फ्रान्सला आतापर्यंत एकही प्रयत्न करता आलेला नाही.

21:44 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: सामन्यातील उत्तरार्धाला सुरुवात

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. अर्जेंटिनाला पुढील ४५ मिनिटे आपली आघाडी कायम राखावी लागणार आहे. असे करण्यात ती यशस्वी ठरली तर ३६ वर्षांनंतर ती विश्वविजेती बनेल. फ्रान्सला पुनरागमन करण्यासाठी किमान दोन गोल करणे आवश्यक आहे.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604508738131460096?s=20&t=6p17nrbUVIHrVt-WjxpcZQ

21:28 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: गोल्डन बूटाचा दावेदार मेस्सी

1. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) - ६ गोल

2. किलियन एमबाप्पे (फ्रान्स) - ५ गोल

3. ऑलिव्हियर गिरौड (फ्रान्स) - ४ गोल

4. ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना) - ४ गोल

सऊदी अरब (पेनल्टी)

मेक्सिको

ऑस्ट्रेलिया

नीदरलैंड (पेनल्टी)

क्रोएशिया (पेनल्टी)

फ्रांस (पेनल्टी)

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604498241021947904?s=20&t=1WxWjFqv3982aE1Zlv40AA

21:18 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: पूर्वाधातील खेळात जोडला ७.०० मिनिटांचा अधिक वेळ

पूर्वाधातील खेळात ७.०० मिनिटांचा अधिक वेळ जोडला गेला. पहिल्या सत्रातील अर्जेंटिनाच्या चमकदार कामगिरीने विश्वचषकातील अंतिम सामन्यात २-० ने फ्रान्सवर आघाडी घेतली आहे. पण त्यादरम्यान २७व्या मिनिटाला फ्रान्सला फ्री किक मिळाली, जी ग्रिजमनने घेतली. त्याने गोळी झाडली, जी गिरूडपर्यंत गेली. पण यादरम्यान फ्रान्सचा बचावपटू थिओ हर्नांडेझने मेस्सीशी कडवी झुंज दिली. मेस्सीला दुखापत झाली, पण त्याला या मोठ्या सामन्यातून बाहेर बसायचे नाही. डोक्याला दुखापत होऊनही मेस्सी लगेच उभा राहिला आणि खेळू लागला.

21:13 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: मारियाने अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली

३६व्या मिनिटाला डी मारियाने आपल्या अनुभवी खेळाचे शानदार प्रदर्शन करत सामन्यातील दुसरा गोल केला. यासह डी मारियाने अर्जेंटिनाला फ्रान्सविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलसाठी अॅलेक्सिस मॅकअलिस्टरने मदत केली. अॅलिस्टरच्या पासवर मारियाने शानदार गोल केला. त्याच्या शॉटला गोलरक्षक लॉरिसकडे उत्तर नव्हते.

21:05 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत गोल करणारा मेस्सी ठरला एकमेव खेळाडू

एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत गोल करणारा मेस्सी एकमेव खेळाडू ठरला आहे. ग्रुप स्टेज, सुपर १६, सुपर ८, सेमी फायनल आणि फायनल यासर्व फेरीत गोल करणारा लिओनेल मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरला आहे. या गोलमुळे तो गोल्डन बूटच्या जवळ पोहचला आहे.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604500100973199361?s=20&t=1WxWjFqv3982aE1Zlv40AA

21:01 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: मेस्सीचा विश्वचषक इतिहासातील १२वा गोल

मेस्सीने विश्वचषकाच्या इतिहासात मोठा विक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत २० गोल केले आहेत. या कालावधीत त्याने १२ गोल केले आहेत, तर ८ गोलांना साथीदारांनी मदत केली आहे. या सामन्यात मेस्सीचा शानदार खेळ सुरूच आहे. या विश्वचषकात मेस्सीचा हा सहावा गोल आहे. गोल्डन बूटच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.

20:56 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल

फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात २० मिनिटे झाली आणि डि मारियाच्या एका प्रयत्नाने पहिली पेनल्टी मिळाली आणि त्याचे रुपांतर स्टार खेळाडू मेस्सीने गोलमध्ये करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक लॉरिसने मेस्सीची पेनल्टी चुकवली आणि या विश्वचषकात मेस्सीने सहावा गोल केला.

https://twitter.com/ElForadeportivo/status/1604497786153889792?t=ZuBd54fMgNgh7nw5XJA7Vw&s=08

20:49 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: सामना सुरु होऊन झाली १० पण एकही गोल नाही

वर्ल्ड कप फायनलमध्ये १० मिनिटांचा खेळ आहे. आतापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आलेला नाही. स्कोअर ०-० असा बरोबरीत आहे. अल्वारेझने तिसरा आणि रॉड्रि डी पॉलने सातव्या मिनिटाला गोल केला, मात्र अर्जेंटिनाला यश मिळू शकले नाही. अल्वारेझचा फटका थेट फ्रेंच गोलरक्षक ह्युगो लॉरिसच्या हातात गेला. त्याचवेळी डी पॉलचा फटका फ्रान्सच्या खेळाडूवर आदळला आणि गोलपोस्टजवळून बाहेर गेला.

20:46 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: फ्रान्सचा कर्णधार लॉरिस जखमी, पण पुन्हा मैदानात

अर्जेंटिनाला सामन्याचा पहिला कॉर्नर ९व्या मिनिटाला मिळाला. कर्णधार मेस्सीने हा कॉर्नर घेतला, पण त्यात त्याला फारसे यश मिळाले नाही. दरम्यान, रोमेरोची फ्रेंच गोलकीपर लॉरिसशी टक्कर झाली, त्यात लोरिसला दुखापत झाली. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. लॉरिस पुन्हा खेळण्यास तयार झाली.

20:38 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: तिसऱ्या मिनिटालाच अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ

तिसऱ्या मिनिटालाच अर्जेंटिनाने आक्रमक खेळ दाखवला. फ्रान्सच्या गोलपोस्टमध्ये लिओनेल मेस्सी आणि ज्युलियन अल्वारेझ यांनी आक्रमक खेळ दाखवला. अल्वारेझने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण हा शॉट फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरिसने वाचवला.

20:32 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: अर्जेंटिना वि. फ्रान्स अंतिम सामन्याला सुरुवात,

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्याचा पूर्वार्ध सुरू झाला आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स सुरुवातीच्या आघाडीवर आहेत. सर्वांच्या नजरा अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पे यांच्यावर आहेत. अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकली.

20:14 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: यासाठी सर्वकाही! फिफा विश्वचषकाचे अनावरण

फिफा विश्वचषक २०२२ च्या चमचमणााऱ्या चषकाचे अनावरण करण्यात आले. त्याचा व्हिडिओ फिफाने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604485887982567426?s=20&t=h-SS_t_n5HqmYzxGEjhHkQ

19:56 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: फिफा विश्वचषकाचा रंगारंग समारोप सोहळा

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी विश्वचषकाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी आपले सादरीकरण केले. समारोप समारंभात डेव्हिडोने आपल्या गाण्याने सर्वांची मने जिंकली. इंग्लिश पत्रकार पियर्स मॉर्गनने फायनलबाबत दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/nathanmpama_/status/1604478473002680323?s=20&t=ND9euJqH18NuR1eRIM2x_g

19:47 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: हे असतील दोन्ही संघांचे सुरुवातीला उतरणारे ११ खेळाडू

कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाचा आज अंतिम सामना आहे. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिनाचा सामना गतविजेता फ्रान्सचा आहे. दोन्ही संघांनी ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे. अंतिम सामन्याआधी दोन्ही संघांनी सुरुवातीला मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604478533732126720?t=NlK7Sg2xPBE5AlqLALudlg&s=08

19:27 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पोहचले समालोचक रवी शास्त्री

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात कतारमधील लुसेल स्टेडियमवर हा विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेटचे माजी खेळाडू नावाजलेले समालोचक आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे कतार पोहचले आहेत.

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1604461099717652480?t=oC2PDLvH5QuPHm0UliX6gA&s=08

19:23 (IST) 18 Dec 2022
ARG vs FRA: ब्लॉकबस्टर सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना भिडणार

फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीला विश्वचषकाचे जेतेपद खुणावत आहे. मात्र, जागतिक फुटबॉलमधील सर्वात मोठे यश संपादन करण्यासाठी आज होणाऱ्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेटिनाला गतविजेत्या फ्रान्सचे आव्हान परतवून लावावे लागेल. त्यामुळे मेस्सी आपल्या विश्वविजयाची स्वप्नपूर्ती करणार की फ्रान्सचा संघ विश्वविजेतेपदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार, याकडे जगभरातील फुटबॉल रसिकांचे लक्ष असेल.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1604442324947419137?s=20&t=Ep6REy1YoS_bgx46y1fl0g

FIFA World Cup Final Highlights France vs Argentina: फिफा वर्ल्ड कप फायनल फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना २०२२ हायलाइट्स