करोनानंतर इंग्लिश प्रीमियर लीगला सुरुवात झाल्यानंतर अर्सेनलला अद्याप सूर गवसलेला नाही. गेल्या तीन दिवसांत सलग दुसऱ्या पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अर्सेनलला ब्रायटनकडून १-२ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांची गुणतालिके त १०व्या स्थानी घसरण झाली आहे.

प्रशिक्षक मायके ल अर्टेटा यांना खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येवर उपाय शोधून काढावा लागणार आहे. अन्यथा चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरणे त्यांना कठीण जाणार आहे. बेर्नाड लेनो हा अर्सेनलचा या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू उजव्या पायाच्या घोटय़ावर पडल्यामुळे त्याला दुखापत झाली.

निकोलस पेपे याने ६८व्या मिनिटाला अर्सेनलचे खाते खोलले, पण त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. लुइस डंक (७५व्या मिनिटाला) आणि नील मॉपे याने अखेरच्या क्षणी गोल करत ब्रायटनला विजय मिळवून दिला. दोन दिवसांपूर्वी अर्सेनलला मँचेस्टर सिटीकडून ०-३ असे पराभूत व्हावे लागले होते.

बॉर्नेमाऊथला क्रिस्टल पॅलेस संघाकडून ०-२ अशी हार पत्करावी लागल्यामुळे पुढील वर्षीच्या प्रीमियर लीगमधून त्यांच्यावर बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे. लुका मिलिवोजेव्हिक याने १२व्या मिनिटाला २५ यार्डावरून फ्री-किकवर गोल केल्यानंतर २३व्या मिनिटाला जॉर्डन अयेवने गोल करत क्रिस्टल पॅलेसला विजय मिळवून दिला.

अ‍ॅटलेटिको माद्रिद तिसऱ्या स्थानी

ला-लीगा फुटबॉलला प्रारंभ झाल्यानंतर घरच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदला विजयासाठी संघर्ष करावा लागला. विटोलो माचिन याने ८१व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या बळावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने व्हॅलाडोलिड संघाचा १-3० असा पराभव करत गुणतालिके त ५२ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली. बार्सिलोनाने ६५ गुणांसह रेयाल माद्रिदला तीन गुणांनी मागे टाकत अग्रस्थान काबीज केले आहे.