या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. प्रकाश परांजपे

‘खेळल्याने होत आहे रे, आधी खेळलेची पाहिजे’ हा मंत्र ब्रिजला १०० टक्के  लागू होतो. ब्रिजमध्ये शिकण्यासारखं बरंच आहे; पण ते न खेळलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरूनच जाण्याची शक्यता जास्त. दोनचार डाव खेळून, थोडे टक्के टोणपे खाऊन, मग एखादं पुस्तक हातात घेणाऱ्याची किंवा एखाद्या तज्ज्ञ खेळाडूला प्रश्न विचारणाऱ्याची भूमिका नवीन काही शिकण्यासाठी सगळ्यात जास्त पात्र अशी असते. एरवी जमा केलेली माहिती बऱ्याच अंशी पालथ्या घडय़ावर पाणी अशी वाया जाते.

गेल्या सहा महिन्यांत या स्तंभामधील लेख वाचून तुमच्यापैकी काही मंडळींनी खेळ मांडायचा प्रयत्न केला असेल अशी आशा आहे. अर्थातच कोविडमुळे जर तुम्हाला आत्तापर्यंत ते शक्य झालं नसेल तर खालील चित्रफिती बघून जरूर प्रयत्न  करा.

या चित्रफिती बघून आणि आत्तापर्यंत या स्तंभामध्ये आलेले लेख वाचून तुम्हालाही चार खेळाडू जमवून ब्रिजचा डाव नक्कीच मांडता येईल याची मला खात्री आहे. काही शंका असल्यास त्या जरूर विचारा. त्याकरिता ई मेल वापरू शकता. यूटय़ूबच्या  चित्रफितीच्या खाली प्रश्न विचारू शकता किंवा आणखीन काही माध्यमं आपल्याला जास्त सोयीचं असेल तर आपण त्याचाही वापर करू शकतो.

चार खेळाडू जमवून ब्रिज खेळणं, जर कोविडमुळे शक्य होत नसेल तर ही कोडी सोडवून आपण या खेळाचा श्रीगणेशा करू शकता. वरील चित्रात असं एक ब्रिजचं तंत्रकूट दिलं आहे. दक्षिणेचा खेळाडू ६ बिनहुकमी हा ठेका खेळतो आहे, म्हणजेच बिनहुकमी खेळात १२ दस्त दक्षिणेच्या खेळाडूला जिंकायचे आहेत. पश्चिमेने इस्पिक गुलामाची उतारी केली.  दक्षिणेच्या खेळाडूने कसा खेळ करावा म्हणजे त्याला १२ दस्तांची खात्री करता येईल?

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com

लोकसत्ता ब्रिज स्तंभ वाचकांसाठी

* पत्त्यांची ओळख :

* पत्ते पिसणे व वाटणे :

* पत्ते हातात कसे धरावे :  https://youtu.be/vHwmIxKrFww

* ब्रिजमध्ये पाने खेळण्याचे नियम चित्रफीत १ : https://youtu.be/bWJJXlXLwcA

* ब्रिजमध्ये पाने खेळण्याचे नियम चित्रफीत २ :

* ब्रिजमध्ये पाने खेळण्याचे नियम चित्रफीत ३ : https://youtu.be/MDqayC_bDOA

* ब्रिजमध्ये पाने खेळण्याचे नियम चित्रफीत ४ : https://youtu.be/mOsrZRbVJKA
* ब्रिजमध्ये पाने खेळण्याचे नियम चित्रफीत ५ : https://youtu.be/WqT_XS_kAUo

* के डी जोशी ब्रिज बोलीभाषेबद्दल अधिक माहिती     https://youtu.be/mwqvxSVKyeU

* के डी जोशी ब्रिज बोलीभाषा उदाहरणे चित्रफीत ०१       https://youtu.be/TxWkLYiCfCu

* के डी जोशी ब्रिज बोलीभाषा उदाहरणे चित्रफीत ०२       https://youtu.be/rMTyPKkimSQ

* के डी जोशी ब्रिज बोलीभाषा उदाहरणे चित्रफीत ०३          https://youtu.be/kJHUEvnjiTs

* के डी जोशी ब्रिज बोलीभाषा उदाहरणे चित्रफीत ०४   https://youtu.be/sOmZsHKIxrq

* के डी जोशी ब्रिज बोलीभाषा उदाहरणे चित्रफीत ०५          https://youtu.be/_EsuZhKlLYo

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on bridge game mechanism abn
First published on: 05-07-2020 at 00:06 IST