पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यावरून आगपाखड केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा प्रत्युत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर त्यांना आमच्याशिवाय विश्वचषक खेळावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, राजकीय तणावामुळे २०१२ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्याचबरोबर टीम इंडियाने १४ वर्षांपासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. भारताने २००८ मध्ये आशिया कप खेळण्यासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.

आता पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत सांगितले होते की, भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानला धक्का बसला आहे. त्यानंतर पीसीबीने लगेचच एक निवेदन दिले की पुढील वर्षी भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ते देखील भारतीय दौऱ्यावर येणार नाहीत.

पुन्हा एकदा पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी त्याच विधानाची पुनरावृत्ती केली आहे. एका उर्दू न्यूज चॅनेलवर बोलताना रमीझ राजा म्हणाले, ‘पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा संघ खेळला नाही, तर ही स्पर्धा कोण पाहणार? या प्रकरणी आमचे स्पष्ट म्हणणे आहे की जर भारतीय संघ इथे (पाकिस्तान) आला तरच आम्ही तिथे (भारत) वर्ल्ड कपसाठी जाऊ.’

भारताला पाकिस्तानशिवाय विश्वचषक खेळावा लागेल –

रमीझ राजा म्हणाले, ”जर ते (भारतीय संघ) आले नाहीत तर त्यांना आमच्याशिवाय विश्वचषक खेळावा लागेल. आम्ही आमची आक्रमक वृत्ती कायम ठेवू. आमच्या संघाने चमकदार कामगिरी करून दाखवून दिले आहे. पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे. हे तेव्हाच घडू शकते, जेव्हा आपण चमकदार कामगिरी करून दाखवतो.”

हेही वाचा – FIFA World Cup 2022: वेन हेनेसी वर्ल्ड कप इतिहासात रेड कार्ड मिळवणारा ठरला तिसरा गोलरक्षक, पाहा अगोदर कोणाला मिळाले

पीसीबी अध्यक्ष म्हणाले, ”गेल्या २०२१ टी-20 विश्वचषकात आम्ही भारतीय संघाचा पराभव केला होता. यावेळी आशिया चषकातही त्यांना पराभव पत्करावा लागला. अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेल्या भारतीय संघाचा वर्षभरात दोनदा पराभव केला आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 rameez raja once again made a controversial statement saying that india will have to play the world cup without pakistan vbm
First published on: 26-11-2022 at 10:38 IST