Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन भारताच्या सामन्यांसाठी तटस्थ स्थळांसह करण्याचा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) दिला. पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी सांगितले की, “त्यांनी हा प्रस्ताव एसीसीकडे पाठवला आहे. यामध्ये भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळू शकतो तर उर्वरित देशांचे संघ पाकिस्तानमध्ये खेळतील.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता आणि आशियाई स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. पीसीबी प्रमुख म्हणून रमीझ राजाची जागा घेणारे सेठी म्हणाले, “आम्ही ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’वर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे पाकिस्तान आशिया चषक सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळेन आणि भारत त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळेन. आशियाई क्रिकेट परिषदेकडे आम्ही हा प्रस्ताव दिला आहे.”

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानला भारतात जाण्याचा सल्ला

आशिया चषक २ ते १७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. मात्र, कुठे होणार मालिका या अनिश्चिततेमुळे सामन्यांचे नेमके वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्यासह पात्रता संघ सहभागी होणार आहेत.

पात्रता स्पर्धा नेपाळमध्ये सुरू आहे. पुढील महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या भारत भेटीपासून सेठी यांना खूप आशा आहेत. परराष्ट्र मंत्र्यांच्या गोवा भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: LSG vs GT: ईद मुबारक! राशिद-शमीने गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा, गुजरात-लखनऊच्या खेळाडूंचा सेलिब्रेशन Video व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी म्हणाले, “आम्हाला सांगण्यात आले आहे की संबंध सामान्य असू शकतात. असे झाल्यास भारत २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याचा विचार करेल. आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळण्याबरोबरच विश्वचषकासाठी आम्हाला भारतात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.”

सेठी यांनी मात्र हा सल्ला कोणी दिला हे सांगितले नाही. पाकिस्तानने भारतासोबत समान अटींवर क्रिकेट खेळावे, असे आपल्या देशातील जनतेचे मत असल्याचे सेठी यांनी सूचित केले. ते म्हणाले, “भारताविरुद्ध खेळण्यासाठी आमच्या सरकारचे कोणतेही बंधन नाही, परंतु मी देशातील जनतेचा विचार करता असे म्हणू शकतो की आम्ही लाचार नाहीत, आम्ही आर्थिकदृष्ट्या आमच्या पायावर उभे राहू शकतो. आम्हाला भारतासोबत सन्मानजनक क्रिकेट खेळायचे आहे. आमची एसीसीशीही चर्चा सुरू आहे.”

हेही वाचा: Sachin @50: तेंडल्या ५० वर्षाचा होणार! “तुम्ही आठवण…” वयाच्या प्रश्नावर सचिनची मजेशीर टिप्पणी

भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन सामने होणार का?

आता जर आपण स्पर्धेच्या स्वरूपाबद्दल बोललो तर यावेळी एकदिवसीय स्वरूपातील आशिया चषक असेल जो सप्टेंबर महिन्यात खेळवला जाऊ शकतो. या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ही चांगली तयारी असेल. यावेळीही एकूण ६ संघ सहभागी होणार असून त्यांची ३-३ गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील जिथे या दोघांमध्ये साखळी फेरीत पहिला सामना खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ सुपर ४ मध्ये गेले तर तिथेही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. यानंतर सुपर ४ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अव्वल राहिले तर अंतिम फेरीतही दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होऊ शकते. आगामी स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. आत्तापर्यंत, कोणत्याही प्रकारचे अधिकृत वेळापत्रक आणि ठिकाण तपशीलांची प्रतीक्षा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 pak bows down to india ready to play at neutral venue rest of the teams will play in pakistan avw
First published on: 22-04-2023 at 17:10 IST