Sri Lanka vs Hong kong Asia Cup 2025 Highlights: संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत युएईने ओमानवर विजय मिळवला. दुसरी लढत श्रीलंका आणि हाँगकाँग यांच्यात होत आहे.

Live Updates

Asia Cup 2025 Sri Lanka vs Hong Kong Highlights: आशिया चषक हाँगकाँग वि. श्रीलंका सामन्याचे हायलाईट्स

23:39 (IST) 15 Sep 2025

श्रीलंकेचा हाँगकाँगवर संघर्षमय विजय

सुपर फोर फेरीत प्रवेशाच्या दृष्टीने विजय आवश्यक असणाऱ्या श्रीलंकेला हाँगकाँगविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला. हाँगकाँगने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावांची मजल मारली. पाथुम निसांकाच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेचा संघ विजयाच्या दिशेने सहज वाटचाल करत होता. मात्र हाँगकाँगने अवघ्या १० मिनिटात ४ विकेट्स घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं. वानिदू हासारंगाने फलंदाजीतली उपयुक्तता सिद्ध करत ९ चेंडूत नाबाद २० धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हाँगकाँगने निझाकत खानच्या ५२ आणि अँशी रथच्या ४८ धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेसमोर १५० धावांचं लक्ष्य ठेवलं. खानने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी साकारली. रथने ४६ चेंडूत ४ चौकारांसह ४८ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे दुश्मंत चमीराने २ तर वानिंदू हासारंगा आणि दासून शनका यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या पण पाथुम निसांकाने विविध साथीदारांना हाताशी घेत किल्ला लढवला. निसांकाने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. विजय दृष्टिक्षेपात आलेला असताना निसांका धावबाद झाला. पाठोपाठ कुशल परेराही बाद झाला. कर्णधार चरित असालंका आणि कामिंदू मेंडिस माघारी परतल्याने हाँगकाँगने चमत्कार घडवणार असं चित्र निर्माण झालं. मात्र वानिंदू हासारंगाने सगळा अनुभव पणाला लावत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. १८व्या षटकात मिळालेला नोबॉल आणि हाँगकाँगच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा श्रीलंकेने फायदा उठवला.

23:29 (IST) 15 Sep 2025

हाँगकाँगची मुसंडी; श्रीलंकेने १० मिनिटात गमावल्या ४ विकेट्स

हाँगकाँगने बलाढ्य श्रीलंकेला दणका देत वाटचाल केली आहे. अवघ्या १० मिनिटात श्रीलंकेने ४ विकेट्स गमावल्या आहेत. कर्णधार चरित असालंकापाठोपाठ कामिंदू मेंडिसही बाद होऊन परतला आहे.

23:28 (IST) 15 Sep 2025

Asia Cup 2025: टीम इंडियाची सुपर फोरमध्ये धडक, युएईमुळे पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर होण्याची भिती; कसं आहे समीकरण?

Asia Cup Points Table: आशिया चषक २०२५ मध्ये अ गटात सुपर फोरसाठी कसं चित्र आहे, जाणून घेऊया. ...सविस्तर बातमी
23:26 (IST) 15 Sep 2025

श्रीलंकेचा कर्णधारही माघारी

कर्णधार चरित असालंकाकडून अपेक्षा असताना तोच बाद होऊन तंबूत परतला आहे. एहसान खानने त्याला बाद केलं.

23:19 (IST) 15 Sep 2025

दोन चेंडूत दोन विकेट्स; हाँगकाँग चमत्कार घडवणार?

सामन्याची सूत्रं हाती घेतलेल्या पाथुम निसांकापाठोपाठ कुशल परेराही बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला आहे. कुशलने २० धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेले दोन फलंदाज माघारी परतल्याने कर्णधार चरित असालंकावर मोठी जबाबदारी आहे.

23:17 (IST) 15 Sep 2025

श्रीलंकेला धक्का

शतकाकडे कूच करणारा पाथुम निसांका रनआऊट होऊन तंबूत परतला आहे. ४४ चेंडूत ६८ धावा करून निसांका बाद झाला आहे.

23:03 (IST) 15 Sep 2025

पाथुम निसांकाचं अर्धशतक

श्रीलंकेचा ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट पाथुम निसाकांने आणखी एक अर्धशतक साकारलं आहे. निसाकांने सामन्याची सूत्रं हाती घेतली आहेत.

22:34 (IST) 15 Sep 2025

Asia Cup 2025: युएईच्या कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

Muhammad Waseem Record: युएई संघाचा कर्णधार मोहम्मद वसीमने ओमानविरूद्ध मोठा विक्रम केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने नवा इतिहास घडवला आहे. ...सविस्तर वाचा
22:23 (IST) 15 Sep 2025

कुशल मेंडिस माघारी

फटकेबाजीच्या प्रयत्नात असलेल्या कुशल मेंडिसला हाँगकाँगच्या आयुष शुक्लाने बाद केलं. त्याने ११ धावा केल्या.

21:46 (IST) 15 Sep 2025
हाँगकाँगने श्रीलंकेला दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

हाँगकाँगने प्रथम फलंदाजी करताना अनुभवी श्रीलंका संघासमोर चांगली कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली. हाँगकाँगने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर अंशुमन रथने ४८ धावांची तर निजाकत खानने नाबाद ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह श्रीलंकेला विजयासाठी १५० धावांचं लक्ष्य दिलं आहे.

21:41 (IST) 15 Sep 2025

निजाकत खानचं अर्धशतक

हाँगकाँग संघाचा मधल्या फळीतील फलंदाज निजाकत खानने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं आहे. निजाकत खानने अनुभवी श्रीलंका संघासमोर शानदार फटकेबाजी केली आणि ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या आहेत.

21:12 (IST) 15 Sep 2025
श्रीलंकेविरुद्ध हाँगकाँगची दमदार सलामी

श्रीलंकेसारख्या अनुभवी संघाविरुद्ध खेळताना हाँगकाँगने चांगली सुरुवात केली आहे. हाँगकाँगच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिली.

21:12 (IST) 15 Sep 2025

युएईने मारली बाजी

ओमानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला पण युएईच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. युएईने १७२ धावांची मजल मारली. कर्णधार मुहम्मद वासीमने ६९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना ओमानचा डाव १३० धावांतच आटोपला. जुनैद सिद्दीकीने २३ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

21:10 (IST) 15 Sep 2025

युएईचा ओमानवर विजय

मुहम्मद वासीम आणि जुनैद सिद्दीकी यांच्या शानदार खेळाच्या बळावर युएईने ओमानवर ४२ धावांनी विजय मिळवला.

20:54 (IST) 15 Sep 2025

जुनैद सिद्दीकी ठरला किमयागार

ओमानचा डाव झटपट गुंडाळण्यात युएईचा जुनैद सिद्दीकी किमयागार ठरला. जुनैदने सातत्याने विकेट्स पटकावत ओमानच्या डावाला खिंडार पाडलं.

20:51 (IST) 15 Sep 2025

युएई विजयाच्या दिशेने

युएईने दमदार विजयाच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. ओमानने सात विकेट्स गमावल्या आहेत. धावगतीचं आव्हान १३च्या पुढे गेलं आहे.

20:45 (IST) 15 Sep 2025

ओमानने ओलांडली शंभरी

अडखळत सुरुवातीनंतर ओमानने शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. पण धावगतीचं आव्हान त्यांच्यासाठी कठीण झालं आहे.

20:06 (IST) 15 Sep 2025

ओमानची घसरण सुरूच

युएईच्या गोलंदाजीसमोर ओमानची घसरण सुरूच असून त्यांनी ४ विकेट्स गमावल्या आहेत.

19:46 (IST) 15 Sep 2025

ओमानची अडखळत सुरुवात

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या ओमानला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. जतिंदर सिंग आणि आमीर कलीम हे बिनीचे शिलेदार झटपट तंबूत परतले.

19:27 (IST) 15 Sep 2025

युएईने ओमानसमोर ठेवलं १७३ धावांचं लक्ष्य

कर्णधार मुहम्मद वासिमच्या ६९ धावांच्या खेळीच्या बळावर युएईने ओमानविरुद्ध १७२ धावांची मजल मारली. वासिमने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ चेंडूत ६९ धावा केल्या. ओमानकडून जितेन रामानंदीने २ विकेट्स पटकावल्या.

19:04 (IST) 15 Sep 2025

मुहम्मद वासिमची फटकेबाजी, युएईनो ओलांडला दीडशेचा टप्पा

मुहम्मद वासिमच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर युएईने दीडशेचा टप्पा ओलांडला आहे.

18:43 (IST) 15 Sep 2025

समय श्रीवास्तव चमकला

समय श्रीवास्तवने असिफ खानला बाद केलं. तो केवळ दोनच धावा करू शकला.

18:28 (IST) 15 Sep 2025

जितेन रामानंदीने मिळवून दिलं ओमानला पहिलं यश

जितेन रामानंदीने ओमानला युएईविरुद्ध पहिलं यश मिळवून दिलं. त्याने अलिशान शराफूला बाद केलं. त्याने ३८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.

18:19 (IST) 15 Sep 2025

युएईची खणखणीत सुरुवात

मुहम्मद वासीम आणि अलिशान शराफू यांनी युएईला दमदार सुरुवात करून दिली आहे. अबू धाबीत सुरू असलेल्या या लढतीत ओमानने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. ओमानच्या गोलंदाजांना या संधीचं सोनं करता आलेलं नाही.

Sri Lanka vs Hong Kong Asia Cup 2025: श्रीलंकेला कडवी झुंज देत हाँगकाँगविरूद्ध विजयाची नोंद करावी लागली.