पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळांदरम्यान आशिया चषक स्पर्धेच्या विजयी चषकासंदर्भातील वादावर पडदा पडला असून, येत्या काही दिवसांत चषकाच्या वितरणाबाबत सुवर्णमध्य काढण्यासाठी काम केले जाईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी शनिवारी दिली.
आशिया चषक स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वी यांनी हा चषक आशियाई क्रिकेट परिषदेच्या संयुक्त अमिराती येथील कार्यालयात नेऊन ठेवला आणि माझ्याशिवाय चषकाला कुणी हात लावायचा नाही, (पान ४ वर)
आशिया चषकासंदर्भात तोडगा शक्य
हा चषक फक्त आणि फक्त माझ्याच हस्ते वितरित करण्यात येईल,’ अशी भूमिका घेतली होती. ‘बीसीसीआय’ने यानंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत उपस्थित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा विषय बैठकीच्या मूळ विषय पत्रिकेवर नव्हता. त्यामुळे बैठकीनंतर स्वतंत्रपणे ‘बीसीसीआय’ आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी यांची स्वतंत्र बैठक ‘आयसीसी’च्याच वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ‘आयसीसी’चे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते. याच बैठकीत वादावर सुवर्णमध्य काढण्याचे निश्चित करण्यात आले, असे सैकिया यांनी सांगितले.
बैठकीसाठी उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी पुढाकार घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. बैठकीचा अधिक तपशील समोर आला नसला, तरी वाटाघाटीला सुरुवात झाली असून, याबाबत समोर येणाऱ्या विविध पर्यायांवर काम केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
भारताला विजेतेपद
ब्रिस्बन : पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा पाचवा सामना शनिवारी पावसामुळे रद्द करण्यात आल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकल्यावर भारताने तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती.
