Australia vs Afghanistan Today’s Playing 11: विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिले काही सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग पाच सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्याच्या लढाईत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.

ऑस्ट्रेलियन संघ सध्या तिसर्‍या स्थानावर आहे आणि इतर कोणताही संघ उपांत्य फेरीत थेट आव्हान देण्याच्या स्थितीत दिसत नाही, परंतु पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ हा सामना जिंकून अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित करेल अशी आशा आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, जिथे फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण

अफगाणिस्तानकडे कुशल फिरकीपटू आहेत आणि त्यांचे फलंदाज ऑस्ट्रेलियन आक्रमणाविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. अशा स्थितीत हा सामना रोमांचक होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅडम झाम्पाच्या रूपाने अनुभवी फिरकी गोलंदाजही आहे, ज्याने आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक १९ विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने सलग पाच सामने जिंकल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असावा. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी आतापर्यंत सात सामन्यांत केवळ तीन अर्धशतके झळकावली आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांची अशी कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंतच्या क्रमवारीत चांगली कामगिरी केली आहे. सात सामन्यात दोन शतकांच्या मदतीने त्याच्या नावावर ४२८ धावा आहेत. ट्रॅव्हिस हेडनेही दोन सामन्यांत १२० धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाला त्याच्याकडून वेगवान सुरुवातीची आशा असेल.

अफगाणिस्तानने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे, परंतु गेल्या पाचपैकी चार सामने जिंकल्यामुळे त्यांच्या संघाचे मनोबलही उंचावले आहे. मात्र, अफगाणिस्तानला त्यांच्या पुढील दोन सामन्यांमध्ये नेट रनरेटकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (२८२ धावा), रहमत शाह (२६४), अझमतुल्ला उमरझाई (२३४), रहमानउल्ला गुरबाज (२३४) आणि इब्राहिम जादरान (२३२ धावा) यांनी फलंदाजीत दाखविलेल्या सातत्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला सलग तीन सामने जिंकण्यात यश आले आहे.

हेही वाचा: World Cup 2023: विराट कोहलीने केले फिंगर क्रॉस, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये सचिनची इच्छा होईल पूर्ण? जाणून घ्या

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिदीने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. फजलहक फारुकीच्या जागी नवीन-उल-हक खेळत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शचे पुनरागमन झाले आहे. कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्ह स्मिथ खेळत नाहीत. स्मिथला दुखापत झाली आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.