Aus Vs SA Boxing Day Test: दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि दोन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेने सुरूवात झालेल्या या दौऱ्यात यजमानांनी पहिला सामना जिंकला. दुसरा सामना बॉक्सिंग डे म्हणजे सोमवारपासून (२६ डिसेंबर) खेळला जात आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसले. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक दिसली. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील १३व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड गोलंदाजी करता होता. या षटकातील एका चेंडूवर कट अॅण्ड बोल्ड झाला. पण बेल्स स्टंप्सवरून खाली न पडल्यानं त्याला नॉटआऊट ठरला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायन एल्गरला स्लेज करताना दिसत आहे. त्यानं एल्गारला म्हटलं की ‘मला वाटते की ही तुला सांतानं ख्रिसमस भेट दिली. एल्गारनंही लायनच्या स्लेजला उत्तर देत “मी चांगला मुलगा आहे” असं म्हटलं.

थोडक्यात वाचला डीन एल्गर

ही संपूर्ण घटना सामन्याच्या १३व्या षटकात घडली, खरं तर, या षटकात गोलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडची एक चेंडू एल्गरने त्याच्या पायाजवळ अडवली. यानंतर चेंडू मागे फिरला आणि स्टंपवर आदळला, जरी आफ्रिकन कर्णधार खूप भाग्यवान होता आणि चेंडू विकेटला आदळल्यानंतरही जामीन पडले नाही आणि तो नाबाद राहिला.

हेही वाचा: Hockey World Cup: ‘सिंग इज किंग’! हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हॉकी विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज

या घडलेल्या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी चकमक झाली. त्याच वेळी, या भाग्यवान बचावानंतर, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन एल्गरला स्लेज करताना दिसला. त्याने एल्गारला सांगितले की “मला वाटते की ही तुझी सांताची भेट आहे… मला वाटते सांता उशीरा आला आहे.” एल्गारनेही लायनच्या स्लेजला उत्तर देत “मी चांगला मुलगा आहे.” असे म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिका १८९ धावांवर सर्वबाद झाली

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १८९ धावसंख्येवरच आटोपला. आफ्रिकेकडून काइल व्हेरेने आणि मार्को यान्सेन यांनी सर्वाधिक धावा केल्या. व्हेरेनेने ५२ आणि यान्सेनने ५९ धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने १०.४ षटकात २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू झाला असून डेविड वॉर्नर आणि लॅब्यूशेन खेळपट्टीवर उपस्थित आहे. या सामन्याचा पहिला दिवस संपला असून ऑस्ट्रेलियाने ४५ धावा करत एक विकेट गमावली. उस्मान ख्वाजा १ धाव करत बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs sa santa claus gift to a good boy watch dean elgars hilarious reply to lyon as he remains unbeaten despite the ball hitting the stumps video avw
First published on: 26-12-2022 at 17:41 IST