ICC Cricket World Cup 2023, Australia vs Sri Lanka: ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच चाहत्यांचेही मनोरंजन करतो. मात्र, यावेळी त्याने सर्वासमोर एक आदर्श ठेवत चाहत्यांची मने जिंकली. वास्तविक, वॉर्नरने पावसात मैदानावरील कव्हर्स ओढण्यात ग्राउंड स्टाफला मदत केली. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान वॉर्नरने अशी कृती केली तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसामुळे काही काळ खेळावर परिणाम झाला होता. पावसादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या स्टाईलने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. ३३वे षटक सुरू होताच पावसाने सामन्यात व्यत्यय आणला, त्यानंतर खेळाडूंनी मैदान सोडले. स्टेडियममधील कर्मचारी खेळपट्टी झाकण्यासाठी धावले. हे पाहून ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मैदानावरील कर्मचाऱ्यांना खेळपट्टी झाकण्यात मदत केली आणि कव्हर्स खेळपट्टीवर नेल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान

ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव ४३.३ षटकांत २०९ धावांत गुंडाळला. लंकन संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पाथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका ६१ धावा करून बाद झाली. त्याच्यानंतर कुसल मेंडिस ७८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ २०९ धावांवर गडगडला.

निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित असलंकाला दुहेरी आकडा गाठता आला, त्याने २५ धावा केल्या. कर्णधार दासुन शनाका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारी सदीरा समरविक्रमा ८ धावांवर बाद झाली. धनंजय डी सिल्वा ७ आणि लाहिरू कुमारा ४ धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेल्लालागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महेश तिक्षणा खाते न उघडताच तंबूत परतला. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले आणि ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.

हेही वाचा: AUS vs SL, World Cup: ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यादरम्यान वादळाचा तडाखा, एकाना स्टेडियममध्ये प्रेक्षक थोडक्यात बचावले; पाहा Video

लाबुशेन आणि जोश इंग्लिशने डाव सांभाळला

तीन विकेट्स पडल्यानंतर मार्नस लाबुशेन आणि जोश इंग्लिश यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने २४ षटकात ३ विकेट्स गमावत १२७ धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेन आणि जोश इंग्लिश दोघेही ३१ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी उर्वरित २६ षटकांत ८३ धावांची गरज आहे.