मेलबर्न : तब्बल दीड वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने (नाबाद ५७) साकारलेल्या आणखी एका अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला सात गडी आणि १४ चेंडू राखून धूळ चारली.या विजयासाह ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. श्रीलंकेने दिलेले १४३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १८व्या षटकातच गाठले. सामनावीर वॉर्नरलाच (तीन सामन्यांत २१७ धावा) मालिकावीर पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना कुशल परेराच्या (५७) अर्धशतकामुळे श्रीलंकेने किमान ६ बाद १४२ धावांपर्यंत मजल मारली होती.