जून-जुलै महिन्यात इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी ऑस्ट्रेलियन संघात घाऊक प्रमाणावर बदल करण्याची गरज प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली होती, मात्र त्याच संघाने अवघ्या काही महिन्यांत इंग्लंडवर ५-० असा निर्भेळ विजय मिळवल्याने ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे.
‘‘अॅशेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच असे वर्चस्व दाखवले आहे. पाचवी कसोटी अवघ्या तीन दिवसांत जिंकत तसेच मालिकेत इंग्लंडचे सर्वच्या सर्व १०० बळी मिळवत ऑस्ट्रेलियाने वरचष्मा राखला,’’ अशा शब्दांत ‘द सिडनी डेली टेलिग्राफ’ने प्रशंसा केली आहे.
‘द ऑस्ट्रेलियन’ने म्हटले की, ‘‘ऑस्ट्रेलियाने गाजवलेल्या वर्चस्वाची कोणत्याच विजयाशी तुलना होऊ शकत नाही. या चमूकडून कोणीच काही अपेक्षा केली नव्हती.’’
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियन संघावर स्तुतिसुमनांचा वर्षांव
जून-जुलै महिन्यात इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
First published on: 07-01-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia hails unlikely heroes for complete ashes win