डेव्हिड वॉर्नर झाला पीव्ही सिंधूचा ‘फॅन’; खास पोस्ट करून म्हणाला…

David Warner congratulate PV Sindhu: वॉर्नरने सुवर्णपदक विजेत्या सिंधूसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

डेव्हिड वॉर्नर झाला पीव्ही सिंधूचा ‘फॅन’; खास पोस्ट करून म्हणाला…

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय बॅटमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली. महिला बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक केली. भारतातील चाहत्यांनी तिच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. मात्र, फक्त भारतातच नाही तर परदेशातही सिंधूचे चाहते आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही यात समावेश होतो. वॉर्नरने सुवर्णपदक विजेत्या सिंधूसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

डेव्हिड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुवर्णपदक विजेत्या पीव्ही सिंधूचा फोटो शेअर केला आहे. “शाबास पीव्ही सिंधू, आश्चर्यकारक कामगिरी पूर्ण केली,” असे कॅप्शन वॉर्नरने सिंधूच्या फोटोला दिले आहे. त्याच्या या पोस्टवर पत्नी कँडिसने प्रतिक्रिया दिली आहे. कँडिसने “खूप छान,” अशी कमेंट केली आहे.

डेव्हिड वॉर्नरला भारताविषयी आणि भारतातील लोकांबद्दल किती प्रेम आहे, हे तो वेळोवेळी आपल्या कृतीतून दाखवून देत असतो. भारतीय चित्रपटांतील गाण्यांचे डान्स व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामुळे भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

हेही वाचा – ट्रेंट बोल्टचा मोठा निर्णय; न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार

दोन वेळच्या ऑलिंपिक पदक विजेत्या सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये तिने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक रौप्य पदक जिंकले होते. २०१४मध्ये तिने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मात्र, वैयक्तिक सुवर्णपदकाने तिला हुलकावणी दिली होती. यावर्षी मात्र तिने अचूक खेळ करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या कामगिरीचे डेव्हिड वॉर्नरनेही कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian cricketer david warner congratulate pv sindhu through instagram post vkk

Next Story
इंग्लंडमधील लीग क्रिकेट मुकेश अंबानींच्या रडारवर? रवी शास्त्रींसोबत लॉर्ड्सवर बघितला सामना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी