Glenn Maxwell’s wife Vini Raman has given birth to a lovely son: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या घरातून आनंदाची बातमी आली आहे. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हिने मुलाला जन्म दिला आहे. विनी आणि मॅक्सवेल पालक झाले आहेत. त्यांना एक मुलगा आहे. विनीने मुलाचा अर्धा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्याचा आणि मॅक्सवेलचा हातही दिसत आहे. मॅक्सवेल-विनीच्या या पोस्टवर चाहते अभिनंदन करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही अभिनंदन केले आहे.

वास्तविक मॅक्सवेल आणि विनी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर करत ते आई-वडील झाल्याचे सांगितले. विनीने एका मुलाला जन्म दिला आहे. विनी आणि मॅक्सवेल यांनी मुलाचे नावही ठेवले आहे. त्याचे नाव लोगान मॅव्हरिक मॅक्सवेल असे ठेवण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने या पोस्टवर मॅक्सवेलचे अभिनंदन केले आहे. अनुष्काने कमेंटमध्ये लिहिले की, ‘तुम्हा दोघांचे अभिनंदन.’ याबद्दल अनेक सेलिब्रिटींनी विनी आणि मॅक्सवेलचे अभिनंदन केले आहे.

टीम इंडियाचा खेळाडू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानेही मॅक्सवेल आणि विनीचे अभिनंदन केले आहे. तसेच रायन बर्लसह अनेक सेलिब्रिटींनी मॅक्सवेल आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले आहे. मॅक्सवेल-विनीच्या इन्स्टाग्राम पोस्टला अल्पावधीतच ८ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

कोण आहे ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन?

विनी रमण ही व्यवसायाने फार्मासिस्ट आहेत. तिचा जन्म ३ मार्च १९९३ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला. तिचे कुटुंब दक्षिण भारतातील आहे. तिने मेंटोन गर्ल्स सेकंडरी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिने मेडिकल सायन्समध्ये स्वत:ची कपियर बनवली. तिला मधु रमण नावाची एक बहीण आहे जी व्यवसायाने परिचारिका आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला फायदा, फायनलपूर्वी श्रीलंकेने टीम इंडियाला दिली खास ‘भेट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च २०२२ मध्ये झाले होते लग्न –

प्रदीर्घ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, विनीने २६ फेब्रुवारी २०२० रोजी ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलशी लग्न केले. त्यानंतर दोन वर्षांनी १८ मार्च २०२२ रोजी त्यांचे लग्न झाले. दोघे कधी भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात कसे पडले. याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, परंतु २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्समध्ये हे जोडपे पहिल्यांदा एकत्र दिसले होते. विनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इनस्टाग्रामवर तिचे १ लाख ९१ हजार फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे फोटो इंटरनेटवर शेअर करत असते. नुकताच तिने बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर केला होता.