ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत यावेळी मातब्बर खेळाडूंना जागतिक क्रमवारीत त्यांच्याहून खालच्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंनी घरचा रस्ता दाखविला. त्यात आज महिला गटाची गतविजेती व्हिक्टोरिया अझारेन्कालाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
यावेळीच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अनेक धक्कादायक निर्णय पहायला मिळत आहेत. त्यातला हाही एक धक्कादायक निर्णय होता. व्हिक्टोरिया अझारेन्काचा पोलंडच्या ऍग्निएस्का रॅडवन्स्का हिने ६-१, ५-७, ६-० असा पराभव केला. याआधी महिला गटात सेरेना विल्यम्स आणि मारिआ शारापोवा यांचा चौथ्या फेरीतच पराभव झाला होता. अझारेन्काने मात्र, चौथ्या फेरीत विजयी प्राप्त करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यामुळे यावेळीही अझारेन्का ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिसस्पर्धेच्या विजयीपदाची हॅट्रीक करेल असे संकेत होते. पण, यावेळी ऍग्निएस्का रॅडवन्स्का हिने अझारेन्काचा पराभव करण्याचे मनता पक्केच केले होते की काय? अशा आत्मविश्वासाने ती खेळत होती. ऍग्निएस्का रॅडवन्स्काचा सामना उपांत्य फेरीत कॅनडाच्या डॉमिनिका चिबुल्कोवा हिच्याशी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियन ओपन- गतविजेत्या अझारेन्काला पराभवाचा धक्का
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत यावेळी मातब्बर खेळाडूंना जागतिक क्रमवारीत त्यांच्याहून खालच्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंनी घरचा रस्ता दाखविला. त्यात आज महिला गटाची गतविजेती व्हिक्टोरिया अझारेन्कालाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे
First published on: 22-01-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2014 defending champion victoria azarenka loses