भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आता काउंटी क्रिकेट खेळणार आहे. डरहम काउंटी क्रिकेट क्लबसाठी अक्षर खेळणार असून, या वृत्ताला क्लबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दुजोरा दिला आहे. सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएल खेळत असलेला अक्षर पटेल, १९ ऑगस्ट रोजी काउंटी क्रिकेटचा पहिला सामना खेळणार आहे. काउंटी क्रिकेटमधल्या महत्वाच्या ३ संघांविरुद्ध अक्षर पटेल डरहम क्रिकेट क्लबचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१२ साली अक्षर पटेलने गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. गुजरातकडून खेळताना अक्षर पटेलने अनेक महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. सध्या अक्षरचं भारतीय संघातलं स्थान डळमळीत झालेलं आहे. त्यामुळे काउंटी क्रिकेटच्या माध्यमातून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न अक्षर पटेल करणार यात शंका नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Axar patel to play county cricket for durham cricket club
First published on: 09-04-2018 at 13:15 IST