पाकिस्तान विरूद्ध आयर्लंडमध्ये सध्या टी-२० मालिका खेळवली जात आहे. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानचा संघ खेळत आहे. या मालिकेतील आयर्लंडविरूद्धचा दुसरा सामना जिंकत बाबर आझमने आपल्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. बनून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड दुसरा टी-२० सामना जिंकून त्याने ही कामगिरी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे.

आयर्लंडने दिलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने तीन षटके शिल्लक असताना सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली. पाकिस्तानच्या या विजयात मोहम्मद रिझवान (७५*) आणि फखर जमान (७८) यांच्यात १४० धावांची भागीदारी निर्णय़ाक ठरली आणि त्यामुळेच पाकिस्तानने आयर्लंडवर ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात बाबर आझम गोल्डन डकवर बाद झाला होता.

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

आयर्लंडवरील या विजयासह पाकिस्तान संघाने बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील ४५ वा टी-२० सामना जिंकला. यासह, त्याने अनेक दिग्गज कर्णधारांना मागे टाकले आहे. युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबा या यादीत ४४ टी-२० विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडच्या २०१९ मधील वर्ल्डकप जिंकणारा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि अफगाणिस्तानच्या असगर अफगाण बरोबरी साधत ४२ विजयांसह तिसऱ्या स्थानी आहेत. तर भारताचे कर्णधार एम एस धोनी आणि रोहित शर्मा ४१ विजयांसह बरोबरीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


टी-२० मध्ये सर्वाधिक विजय मिळवलेले कर्णधार
बाबर आझम (पाकिस्तान) – ४५
ब्रायन मसाबा (युगांडा) – ४४
इयॉन मॉर्गन (इंग्लंड) – ४२
असगर अफगाण (अफगाणिस्तान) – ४२
एम एस धोनी (भारत) – ४१
रोहित शर्मा (भारत) – ४१